Maharashtra Politics | अयोध्या यात्रेवरून काँग्रेसचा शिंदे गटाला टोला, भाजप अशी अवस्था करेल की आता थेट चारधाम यात्रेला जावे लागेल

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – Maharashtra Politics | शिवसेना फोडून तयार झालेला शिंदे गट (Shinde Group) सध्या राज्यात सत्ताधारी आहे. शिवसेनेतील नेते आणि पदाधिकारी आपल्याकडे घेण्याचा कार्यक्रम या गटाकडून सातत्याने केला जात आहे. आता शिंदे गटाचे सर्व मंत्री, आमदार अयोध्या दौऱ्यावर (Ayodhya Tour) जाणार आहेत. तर दुसरीकडे राज्यात ओल्या दुष्काळाची स्थिती असताना सरकार दुर्लक्ष करत आहे. यामुळे विरोधक शिंदे गटावर टीका (Maharashtra Politics) करू लागले आहेत. यावरून काँग्रेस खासदाराने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांच्यावर निशाणा साधताना म्हटले की, भाजप (BJP) यांची अशी अवस्था करेल की, त्यांना थेट चारधाम यात्रेला (Chardham Yatra) जावे लागेल.

काँग्रेस खासदार इम्रान प्रतापगढी (Congress MP Imran Pratapgarhi) म्हणाले, भारतीय जनता पक्षाने त्यांची अशी अवस्था करून ठेवली आहे की, येत्या काही दिवसांमध्ये त्यांना थेट चारधामच्या यात्रेला निघून जावे लागेल. आम्ही मुंबई महानगरपालिका निवडणुकांत (BMC Election) पूर्ण ताकदीने लढणार आहोत. मात्र, आधी हे पाहिले पाहिजे की सध्याच्या सरकारमधले 22 आमदार कुठे जाणार आहेत. मुंबई महानगर पालिकेच्या निवडणुका (Brihanmumbai Municipal Corporation Election) तर फार लांबची बाब आहे.

दरम्यान, राज्यात अतिवृष्टीच्या संकटाने शेतकरी पूर्ण उद्ध्वस्त झाला आहे. शेतकरी आणि विरोधक नुकसान भरपाईची आणि ओला दुष्काळ (Wet Drought) जाहीर करण्याची मागणी करत असताना सरकार दुर्लक्ष करत आहे. तर दुसरीकडे सत्ताधारी शिंदे गट आयोध्याला (Maharashtra Politics) निघाला आहे. यावरून सरकारवर टीकेची झोड उठवण्यात येत आहे. शेतकरी आणि जनतेत सरकारबाबतचा रोष दिसून येत आहे. राज्यातील खरा मुख्यमंत्री कोण असा सवालही विचारण्यात येत आहे. यावरून काँग्रेस खासदार प्रतापगढी यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर टीका केली आहे.

काही दिवसांपूर्वी अयोध्येतील हनुमान गढीचे प्रमुख महंत राजूदास महाराज हे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या
भेटीसाठी आले असताना त्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना प्रभू श्रीरामाचे दर्शन घेण्यासाठी अयोध्येला येण्यासाठी
आमंत्रण दिले होते. महंतांचे निमंत्रण शिंदे यांनी स्वीकारले होते.
त्यानंतर आता एकनाथ शिंदे अयोध्येला जाण्याची तयारी करत आहेत.

Web Title :- Maharashtra Politics | congress imran pratapgarhi criticized cm eknath shinde over to be visit ram mandir ayodhya tour

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Anil Bonde | नाना पटोले कोणत्या आधारावर ही मागणी करत आहेत – खासदार अनिल बोंडे

Fatty Liver | सकाळी उठल्यावर डोळ्यांवर येत असेल सूज, तर असू शकतो फॅटी लिव्हरचा संकेत; जाणून घ्या सविस्तर