Maharashtra Politics | अशोक चव्हाण यांनी घेतली देवेंद्र फडणवीसांची भेट; 3 माजी मंत्री आणि 9 आमदार भाजपच्या वाटेवर ?

Maharashtra Politics | congress leader and former chief minister ashok chavan and 3 minister 9 mla might be join bjp
file photo

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – Maharashtra Politics | सध्या राज्यात मोठ्या उत्साहात गणेशोत्सव साजरा होत असताना याच दरम्यान राजकीय घडामोडींना (Maharashtra Politics) वेग आल्याचे पाहायला मिळत आहे. राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) हे राजकीय नेत्यांच्या घरी जाऊन गणपतीचे दर्शन घेत आहेत. मनसे प्रमुख राज ठाकरे (MNS Chief Raj Thackeray) यांच्या भेटीची चर्चा असताना आणखी एक खळबळजनक माहिती समोर येत आहे. काँग्रेसचे नेते अशोक चव्हाण (Congress Leader Ashok Chavan) यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांची भेट घेतली.

 

अशोक चव्हाण आणि देवेंद्र फडणवीस या दोन दिग्गज नेत्यांमध्ये झालेल्या बैठकीमुळे राजकीय वर्तुळात (Maharashtra Politics) चर्चांना उधाण आले आहे. आधीच केंद्रातील काँग्रेसमधील अंतर्गत मतभेदांमुळे अनेकांनी राजीनामे (Resignation) दिले आहेत. तर महाराष्ट्र काँग्रेसमध्ये देखील फूट पडण्याची भीती व्यक्त केली जात आहे. काँग्रेसचा एक गट लवकरच भाजपमध्ये (BJP) प्रवेश करणार असल्याची माहिती आहे. या गटातील माजी मंत्र्यांना दुसऱ्या मंत्रिमंडळ विस्तारात (Cabinet Expansion) शपथ दिली जाणार असल्याची चर्चा रंगली आहे.

 

मिळालेल्या माहितीनुसार, आशीष कुलकर्णी (Ashish Kulkarni) यांच्या घरी देवेंद्र फडणवीस आणि अशोक चव्हाण यांची भेट झाली.
त्यांच्यासोबत तीन नेते आणि 9 आमदार भाजपमध्ये प्रवेश करण्याच्या तयारीत असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात आहे.
त्यामुळे महाराष्ट्र काँग्रेसमध्ये उभी फूट पडू शकते.
या भेटीमागे गणपती दर्शन असलं तरी या दरम्यान काय चर्चा झाली असावी यावरुन राजकीय चर्चा रंगू लागल्या आहेत.

 

महाराष्ट्र काँग्रेस मधील (Maharashtra Congress) खळबळ विधानपरिषद निवडणुकीपासून (Legislative Council Election) दिसली आहे.
काँग्रेसमधील काही मंत्र्यांसह आमदारांचा गट फुटण्याची चर्चा विधानपरिषद निवडणुकीच्या निकालापासून राजकीय वर्तुळात सुरु आहे.
याच पार्श्वभूमीवर आता काँग्रेसमधील गट फुटून शिंदे गटात (Shinde Group) सामिल झाला तर काँग्रेसमधील काही माजी मंत्र्यांना नव्या सरकारमध्ये संधी मिळणार का ? याकडे लक्ष लागले आहे.

 

Web Title : – Maharashtra Politics | congress leader and former chief minister ashok chavan and 3 minister 9 mla might be join bjp

 

Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

 

 

Total
0
Shares
Related Posts