Maharashtra Politics | ‘मित्रा’साठी मुख्यमंत्र्यांची कोट्यावधींची उधळपट्टी, सरकारी तिजोरीतून देणार अडीच कोटी; काँग्रेसचा महायुतीवर आरोप

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – Maharashtra Politics | सध्या राज्यामध्ये अनेक मुद्द्यावरून आंदोलने सुरु असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. एकीकडे मराठा आरक्षणावरुन (Maratha Reservation) समाज आक्रमक झाला आहे. तर दुसरीकडे विविध मुद्यांवरुन शेतकरी (Farmer) आक्रमक झाले आहेत. यातच काँग्रेसने (Congress) महायुती सरकारवर जोरदार हल्लाबोल केला जात असल्याचे दिसत आहे. काँग्रेस नेते आणि विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार (Vijay Wadettiwar) यांनी एक्सवर (ट्विट) एक पोस्ट केली आहे. यातून त्यांनी सत्ताधाऱ्यांवर निशाणा साधला आहे. (Maharashtra Politics)

राज्य सरकारकडून (State Government) निती आयोगाच्या धर्तीवर ‘मित्र’ या संस्थेची स्थापना केली आहे. या संस्थेला शासनाच्या प्रशासकीय इमारतीत जागा कमी पडल्यामुळे हे कार्यालय निर्मल भवन या इमारतीमध्ये स्थलांतरित केले आहे. या कार्यालयाच्या भाड्यासाठी राज्य सरकारच्या तिजोरीतून वर्षाकाठी 2 कोटी 56 लाख रूपये देण्यात येणार असल्याचा आरोप राज्याचे विरोधीपक्ष नेते विजय वडेट्टीवार यांनी केला आहे.

काय म्हणाले विजय वड्डेटीवार?

मुख्यमंत्र्यांच्या मित्राच्या नवीन कार्यालयासाठी राज्य सरकार महिन्याला तब्बल २१ लाख रुपये म्हणजे वर्षाला २ कोटी ५६ लाख रुपय भाडे देणार असून ही सरकारी पैशांची उधळपट्टी आहे. राज्याच्या विकासासाठी नीती आयोगाच्या धर्तीवर स्थापन करण्यात आलेल्या ‘मित्र‘ संस्थेचे कार्यालय नरिमन पॉइंट येथील निर्मल भवन या इमारतीमध्ये स्थानांतरित केले आहे. मंत्रालयासमोर असलेल्या नवीन प्रशासकीय इमारतीत जागा कमी पडत असल्याचे कारण पुढे करत सरकारने हा निर्णय घेतला. (Maharashtra Politics)

Advt.

https://x.com/VijayWadettiwar/status/1703683174382129382?s=20

मित्र संस्थेवर मुख्यमंत्र्यांनी आपल्या मित्राची वर्णी लावली असून आता या मित्राला बसण्यासाठी कोट्यवधी रुपये सरकारी तिजोरीतून देऊन ऐसपैस कार्यालयही देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
सरकारी तिजोरीतून पैसे ओरबडण्यासाठी महायुती सरकारची ही एक आणखी नवीन स्कीम आहे,
अशा शब्दांत विजय वडेट्टीवार यांनी हल्लाबोल केला.

खासगी क्षेत्र आणि अशासकीय संस्थांच्या सहभागाद्वारे राज्याचा जलद
आणि सर्वसमावेश विकास करणे हा ‘मित्र’च्या स्थापनेमागील उद्देश होता.
मात्र खाजगी क्षेत्रात असलेल्या आपल्या मित्र परिवारातील लोकांवर सरकारी तिजोरीतून उधळपट्टी सुरू असल्याचे चित्र आहे,
असा आरोप विजय वडेट्टीवार यांनी केला आहे.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Pune Crime News | व्यावसायिकाला धमकावून खंडणी मागणाऱ्या पुण्यातील दोन पत्रकारांवर FIR, प्रचंड खळबळ