Maharashtra Politics | “भारत जोडो यात्रा रोखायची असेल तर…” राहुल गांधींचे महाराष्ट्र सरकारला आव्हान

मुंबई: पोलीसनामा ऑनलाईन – Maharashtra Politics | हिंदुत्वाचे (Hindutva) मानबिंदू असलेले स्वातंत्र्यवीर सावरकर (Swatantyaveer Savarkar) यांच्यावर काँग्रेस नेते राहुल गांधी (Congress Leader Rahul Gandhi) यांनी काल त्यांच्या भाषणात टीका केली होती. त्यानंतर शिंदे गटाचे (Eknath Shinde Group) खासदार राहुल शेवाळे (MP Rahul Shevale) यांनी राहुल गांधींवर हल्ला केला होता. राहुल गांधींची भारत जोडो यात्रा बंद केली पाहिजे अशी मागणी राहुल शेवाळेंनी केली होती. आता राहुल गांधींनी (Rahul Gandhi) याला प्रत्युत्तर दिले आहे. (Maharashtra Politics)

राहुल गांधींनी (Rahul Gandhi) शिंदे फडणवीस सरकारवर (Shinde Fadanvis Government) हल्लाबोल केला आहे. त्यांना भारत जोडो यात्रा (Bharat Jodo Yatra) रोखायची असेल तर त्यांनी जरूर रोखावी. प्रत्येकाने आपले मत मांडावे. सरकारला ही यात्रा रोखायची असेल तर त्यांनी तो प्रयत्न करावा, असे आव्हान राहुल गांधी यांनी दिले आहे. ते प्रसारमाध्यमांशी बोलत होते. (Maharashtra Politics)

स्वातंत्र्यवीर सावरकरांनी घाबरून इंग्रजांना माफीनामा लिहिला.
महात्मा गांधी, पंडित नेहरू, वल्लभभाई पटेल हे अनेक वर्षे तुरुंगात राहिले,
पण त्यापैकी कोणीही माफीनाम्यांची कोणतीही चिठ्ठी लिहिली नाही.
पण सावरकरांनी घाबरल्यामुळे माफीनाम्यावर सही केली.
सावरकरांनी त्यावेळी एकप्रकारे स्वातंत्र्यलढ्यातील इतर नेत्यांना दगा दिला.
‘ असेही राहुल गांधी यांनी म्हटले होते.

Web Title :- Maharashtra Politics | congress rahul gandhi replied shinde bjp govt over demand to stop bharat jodo yatra in maharashtra

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Ajit Pawar | ‘…बाळासाहेबांना हीच खरी आदरांजली ठरेल’ – अजित पवार