Maharashtra Politics Crisis | निवडणूक आयोग शिवसेना नाव आणि धनुष्यबाण चिन्ह गोठवू शकतं, त्यामुळे आगामी निवडणुकीत…, माजी निवडणूक आयुक्तांनी स्पष्टच सांगितलं

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – Maharashtra Politics Crisis | शिवसेनेत (Shivsena) मोठी फूट पडल्यानंतर शिवसेना आणि निवडणूक चिन्ह धनुष्यबाण (Dhanushyaban Symbol) आपलाच असल्याचा दावा शिंदे गट (Shinde Group) आणि उद्धव ठाकरे गटाने (Uddhav Thackeray Group) केला आहे. यावर निवडणूक आयोग निर्णय घेणार आहे. यासंदर्भात निवडणूक आयोगाचे माजी आयुक्त एस. वाय कुरेशी (Former Election Commission Commissioner S. Y Qureshi) यांनी सांगितले की, आगामी महापालिका (Municipal Corporation) आणि स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत (Local Body Election) धनुष्यबाण हे चिन्ह आणि पक्षाचं शिवसेना हे नाव कुणाला मिळणार याबाबत अद्याप संदिग्धता आहे. याचा निकाल लागण्यासाठी आणखी तीन ते चार महिने वेळ लागेल (Maharashtra Politics Crisis ) असे मत कुरेशी यांनी व्यक्त केले. ते एका मराठी वृत्तवाहीनीशी बोलत होते. ते पुढे म्हणाले, तोपर्यंत चिन्ह आणि पक्षाचं नाव कुणालाही न देता त्याऐवजी दुसरा पर्याय देण्याची शक्यता आहे.

 

एस.वाय कुरेशी म्हणाले, पक्षामध्ये ज्या-ज्या वेळी फुट पडते त्या-त्या वेळी त्याबद्दल नर्णय हा निवडणूक आयोग घेते. 1967 साली ज्यावेळी काँग्रेसमध्ये (Congress) पहिल्यांदा फुट पडली होती त्यावेळी सर्वोच्च न्यायालयात (Supreme Court) ही गोष्ट गेली होती. यानंतर न्यायालयाने हा निर्णय निवडणूक आयोग घेईल असे निर्देश दिले होते. अशा प्रकरणात बहुमताच्या नियमाच्या (Majority Rule) आधारे निर्णय घेतला जातो.

 

महाराष्ट्राच्या सत्तासंघर्षाचा (Maharashtra Politics Crisis) प्रश्न ज्यावेळी सर्वोच्च न्यायालयात गेला, त्यावेळी न्यायालयाने पक्षचिन्हाच्या बाबतीत निवडणूक आयोगाने त्यावेळी निर्णय घेऊ नये असे निर्देश दिले. त्यावेळी आपल्याला आश्चर्य वाटल्याचे कुरेशी यांनी सांगितले. आता न्यायालयाने निवडणूक आयोगाच्या कामकाजात कोणताही हस्तक्षेप न करण्याची भूमिका घेतली आहे. पक्षाच्या फुटीचा प्रश्न किंवा चिन्हाबाबत चा वाद निवडणूक आयोगाच्या अधिकारात असतो, असेही कुरेशी यांनी स्पष्ट केले.

दोन गटात जर पक्षचिन्हाबाबत वाद असेल आणि त्यापैकी एक गट जर निवडणूक आयोगाकडे गेला
तर निवडणूक आयोगाचे ते कर्तव्य असते की याबाबत दुसऱ्या गटाला नोटिस देणं ही जबाबदारी आयोगाची असते.
नंतर दोन्ही बाजूने उत्तर आल्यानंतर यावर सुनावणी होते. दोन्ही बाजू ऐकल्यानंतर निवडणूक आयोग बहुमताच्या आधारे निर्णय देते.
किती आमदार (MLA) आणि खासदार (MP) तसेच निर्वाचित सदस्य आहेत आणि दुसरीकडे पक्षाचे पदाधिकारी कोणत्या बाजूला आहे, या सर्व गोष्टीच्या आधारे निवडणूक आयोग निर्णय देते.

 

आगामी काळात महाराष्ट्रात महापालिका निवडणूका होणार आहेत. त्याच्या आधी शिवसेनेच्या पक्ष चिन्हाचा निर्णय लागणं अशक्य असल्याचे कुरेशी यांनी सांगितले.
ते म्हणाले, पदाधिकाऱ्यांच्या बोगस सह्यांची तपासणी करायला आयोगाला उशीर लागू शकतो.
त्यामुळे त्यांचा निकील लागण्यास नेमका किती वेळ लागेल हे आताच सांगता येणार नाही.
यावर उपाय म्हणजे येत्या निवडणुकीत शिवसेना हे नाव आणि धनुष्यबाण हे चिन्ह गोठवण्याची शक्यता आहे.
हे चिन्ह दोन्ही गटांना मिळणार नाही.
जर हे चिन्ह गोठवले तर दोन्ही गटांना तात्पुरत्या स्वरुपात दुसरं चिन्ह आणि नाव देण्यात येतं, असंही कुरेशी यांनी सांगितले.

 

Web Title :- Maharashtra Politics Crisis | s y quraishi on shivsena party and symbol dhanushyaban in the upcoming elections

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

Chhagan Bhujbal | छगन भुजबळांनी हिंदू समाजाची माफी मागावी, अन्यथा…, भाजप शहर अध्यक्ष जगदीश मुळीक यांचा इशारा

Sunny Leone | बापरे! सनी लिओनीच्या नावाने होतेय मोठी फसवणूक; अभिनेत्रीने स्वत:च केलं अलर्ट, म्हणाली…

Pankaja Munde | ‘…तर मोदीही मला संपवू शकत नाही’, पंकजा मुंडेंच्या वक्तव्यावर विधानसभेचा दाखला देत बंधू धनंजय मुंडे म्हणाले…