Maharashtra Politics Crisis | उद्धव ठाकरेंना आणखी एक मोठा धक्का, शिंदे गटाकडून शिवसेना भवन, पक्षनिधीवर दावा

दिल्ली : वृत्तसंस्था – Maharashtra Politics Crisis | शिंदे गटाला शिवसेना (Shivsena Shinde Group) नाव आणि पक्षाचे चिन्ह मिळाल्यानंतर शिंदे गटाकडून उद्धव ठाकरेंना (Uddhav Thackeray) आणखी एक मोठा धक्का देण्याची तयारी सुरु आहे. शिवसेनेच्या पक्षनिधीवर शिंदे गटाकडून दावा (Maharashtra Politics Crisis) करण्यात आला आहे. या प्रकरणात सुप्रीम कोर्टात (Supreme Court) याचिका दाखल करण्यात आली आहे.

शिवसेना भवन (Shiv Sena Bhavan), सर्व शाखा, सर्व बँकेतील पक्ष निधी एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांच्या नेतृत्वातील शिवसेनेला देण्यात यावा अशी मागणी या याचिकेत करण्यात आली आहे. मुंबईतील वकील आशीष गिरी (Adv. Ashish Giri) यांच्या वतीने सुप्रीम कोर्टात ही याचिका दाखल केली आहे. (Maharashtra Politics Crisis)

निवडणूक आयोगाने काही दिवसांपूर्वी पक्षाचे चिन्ह आणि शिवसेना नाव शिंदे गटाला दिले आहे.
त्यामुळे शिंदे गट हीच अधिकृत शिवसेना झाली आहे.
परंतु केंद्रीय निवडणूक आयोगाच्या (Central Election Commission) आदेशात पक्षनिधीबाबत कोणतीही स्पष्टता नाही.
यामुळे मुंबईचे वकील आशीष गिरी यांनी सुप्रीम कोर्टात याचिका दाखल केली आहे.
बाळासाहेब ठाकरे (Balasaheb Thackeray) यांच्या नेतृत्वातील शिवसेनेची चल-अचल संपत्ती देण्याची मागणी या याचिकेत केली आहे.

Web Title :  Maharashtra Politics Crisis | shinde group has claimed shivsena party funds

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

Chandrakant Patil At Policenama Pune Office | पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांची ‘पोलीसनामा’च्या कार्यालयास सदिच्छा भेट, विविध विषयांवर चर्चा

CM Eknath Shinde | भविष्यात शिंदे-ठाकरे गट पुन्हा एकत्र येणार का?, मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचे मोठं विधान

Maharashtra Politics News | ‘अजित पवारांची तुलना अंधभक्तांशी होते, असे…’, ईव्हीएमच्या वक्तव्यावर संजय राऊतांचा टोला