Maharashtra Politics | रायगड जिल्ह्यात ‘शेकाप’ला मोठा धक्का; माजी जिल्हा परिषद सदस्याचा भाजपमध्ये प्रवेश

0
865
Maharashtra Politics | dilip bhoir resigns from shetkari kamgar paksh joined bjp in the presence of chandrashekhar bawankule
file photo

रायगड : पोलीसनामा ऑनलाईन – Maharashtra Politics | नुकत्याच झालेल्या विधानपरिषदेच्या निवडणुकीत कोकण शिक्षक मतदारसंघात (Konkan Teacher Constituency) शेकापला (Farmers Workers Party) पराभवाला सामोरे जावे लागले होते. भाजपच्या (BJP) ज्ञानेश्वर म्हात्रे (Dnyaneshwar Mhatre) यांनी शेकापचा गड म्हणुन ओळखल्या जाणाऱ्या कोकण शिक्षक मतदारसंघात बाजी मारली होती. त्यानंतर शेकाप साठी अजून एक धक्कादायक बातमी समोर येत आहे. शेकापचे खंदे समर्थक आणि रायगड जिल्हा परिषदेचे माजी समाजकल्याण सभापती दिलीप भोईर यांनी त्यांच्या कार्यकर्त्यांसोबत मुंबईत भाजपमध्ये प्रवेश केला. आज मुंबई येथील भाजप प्रदेश कार्यालयात प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे (Chandrasekhar Bawankule) यांच्या उपस्थितीत हा पक्षप्रवेश सोहळा पार पडला. (Maharashtra Politics)

ADV

 

मागील गेल्या २ वर्षांपासून दिलीप भोईर (Dilip Bhoir) शेकापवर नाराज होते. शेकाप नेत्यांबरोबर त्यांचे जुळत नव्हते, त्यामुळे त्यांचे सतत नेत्यांशी खटके उडायचे. त्यामुळे ते पक्ष सोडण्याच्या तयारीत आहेत. अशी चर्चा होती. सेनेतील फूटीपूर्वी ते शिवसेनेत प्रवेश करतील असे बोलले जात होते. मात्र शिवसेना पक्षात पडलेल्या फुटीमुळे ती चर्चा अधुरी राहिली. गेल्या महिनाभरापूर्वी ते भाजप नेत्यांच्या संपर्कात आले. आणि त्यांचा भाजप प्रवेश निश्चित झाला. त्यांच्या भाजप प्रवेशामुळे अलिबाग तालुक्यात कमजोर असलेल्या भाजपला मोठी ताकद मिळाली आहे. त्यातच शेकाप साठी हा मोठा धक्का असल्याचे बोलले जात आहे. (Maharashtra Politics)

 

गेली २५ वर्षांपासून दिलीप भोईर हे राजकारणात सक्रिय आहेत. प्रथम ते २००७ साली झिराड ग्रामपंचायतीचे सदस्य म्हणुन ते निवडून आले. पुढे त्यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. त्यानंतर त्यांनी शेकाप मध्ये प्रवेश केला. २०१२ व २०१७ या कालावधीत ते मापगाव जिल्हा परिषद मतदार संघातून निवडून आले. त्यानंतर त्यांना रायगड जिल्हा परिषदेचे समाज कल्याण सभापती म्हणून त्यांना काम करण्याची संधी मिळाली. त्या काळात त्यांनी चांगले काम केले. कोरोना काळात गोरगरिबांना मदत आणि लसीकरण मोहीम यामुळे ते चांगलेच चर्चेत राहिले. साई क्रीडा मंडळाच्या माध्यमातून त्यांचे विविध सामाजिक, सांस्कृतिक, शैक्षणिक तसेच क्रीडाविषयक उपक्रम वर्षभर सुरू असतात.

तर यावेळी बोलताना दिपक भोईर म्हणाले की, ‘शेकाप आणि जिल्हा परिषदेच्या माध्यमातून मी गेली काही वर्षे अलिबाग तालुक्याच्या विकासासाठी कार्यरत होतो.
परंतु अलीकडच्या काळात पक्ष नेतृत्वाकडून अपेक्षित प्रतिसाद मिळत नव्हता. त्यामुळे विकास कामात अडथळा येत होता.
अशा परिस्थितीत काम करताना माझ्यासारख्या कार्यकर्त्याची कुचंबणा होत होती. भाजप हा राष्ट्रीय पक्ष आहे आणि देशात,
राज्यात सत्तेत आहे. अलिबागच्या ग्रामीण भागाचा विकास व्हावा यासाठी आम्ही राष्ट्रीय प्रवाहात सामील झालो आहोत.’
असे यावेळी उपस्थितांना संबोधताना दिपक भोईर म्हणाले.
यावेळी, सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण (Ravindra Chavan) , आमदार प्रशांत ठाकूर (Prashant Thakur),
आमदार महेश बालदी (Mahesh Baldi) आदी भाजपनेते यावेळी उपस्थित होते.

 

Web Title :- Maharashtra Politics | dilip bhoir resigns from shetkari kamgar paksh joined bjp in the presence of chandrashekhar bawankule

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

Vaidehi Parashurami | अखेर वैदेही परशुरामीने यशराज मुखाटे सोबतच्या नात्याविषयी केला मोठा खुलासा

Nia Sharma | अभिनेत्री निया शर्माच्या ग्लॅमरस अदानी चाहत्यांच्या हृदयाचे ठोके वाढले; डीप नेक ड्रेसमध्ये दिसत आहे खूपच बोल्ड

Sania Mirza | सानिया मिर्झाचा अबु धाबी ओपनमध्ये पराभव; पहिल्याच फेरीत पडली बाहेर