Maharashtra Politics | विचार सोडून आमच्यासोबत या म्हटलं नव्हतं, काँग्रेसनं उद्धव ठाकरेंना सुनावलं

बुलढाणा : पोलीसनामा ऑनलाइन – Maharashtra Politics | आम्ही सरकारमध्ये एकत्र आलो तेव्हा आम्ही आमची भूमिका सोडावी, त्यांनी त्यांची भूमिका सोडावी असे कोणत्याही पक्षाने अट ठेवली नव्हती. काँग्रेस पक्षाची (Congress Party) भूमिका राहुल गांधी (Rahul Gandhi) यांनी स्पष्ट केली आहे. आम्ही आमची भूमिका सोडणार नाही. आमचे विचार स्पष्ट (Maharashtra Politics) असून आम्ही काय बोलावं, राहुल गांधींनी काय बोलावं याबाबत उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी आम्हाला सांगू शकत नाहीत. आमची भूमिका स्पष्ट आहे अशा शब्दात काँग्रेस नेते माणिकराव ठाकरे (Manikrao Thackeray) यांनी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरेंना (Shiv Sena Uddhav Balasaheb Thackeray) सुनावलं आहे.

 

माणिकराव ठाकरे म्हणाले, आम्ही त्यांना विचार सोडून आमच्यासोबत या म्हटलं नव्हतं. आम्ही तिन्ही पक्षांनी एकत्र येत किमान समान कार्यक्रम आखला. जो जनहिताच्या आणि विकासाच्या दृष्टीने महत्त्वाचा होता. स्वातंत्र्यातील आमची भूमिका स्पष्ट होती. राहुल गांधी यांनी त्यांचा लेखी पुरावा दिला. भारत आणि पाकिस्तान फाळणीचा (India and Pakistan Partition) विचार सावरकर विचारसरणीच्या लोकांनी केला. हिंदू, मुस्लीम एकत्र राहू शकत नाही अशी विधाने, त्यांची भूमिका उघड आहे. आमच्यात आणि ठाकरेंमध्ये वाद (Maharashtra Politics) झाला नाही. त्यांची भूमिका ते मांडत आहेत, आम्ही आमची भूमिका मांडतोय, असे माणिकराव ठाकरे म्हणाले.

काय म्हणाले संजय राऊत?
स्वातंत्र्यवीर सावरकरांचा (Swatantryaveer Savarkar) मुद्दा काढण्याचे काहीच कारण नव्हतं.
हा विषय काढल्यामुळे फक्त शिवसेनेलाच धक्का बसला असं नाही. तर महाराष्ट्रातील काँग्रेस नेत्यांनाही धक्का बसला आहे.
राहुल गांधी यांनी अशा प्रकारचं विधान करण्याची गरज नव्हती.
यामुळे महाविकास आघाडीमध्ये (Mahavikas Aghadi) फूट पडू शकते हे लक्षात घ्या,
असे उद्धव ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत (MP Sanjay Raut) यांनी म्हटलं होतं.

 

Web Title :- maharashtra Politics | dont tell rahul gandhi what to say congress told uddhav thackeray

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

Kantara OTT Release | बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घालणारा कांतारा सिनेमा ‘या’ दिवशी होणार OTT प्लॅटफॉर्मवर रिलीज

Marathi Actor Mohan Joshi | अभिनेते मोहन जोशी पुन्हा श्री स्वामी समर्थांच्या भूमिकेत; ‘या’ मालिकेत होणार एन्ट्री

Pune Crime | मार्केटयार्ड येथे गोळीबार करुन दरोडा घालणाऱ्या 3 फरार आरोपींना पिस्टलसह अटक, गुन्हे शाखा युनिट-3 ची कारवाई