Maharashtra Politics | ‘… तर शिवाजी महाराजांचा फोटो काढून उद्धव ठाकरेंनी जनतेत जाऊन दाखवावं’, शिंदे गटाच्या आमदाराचं उद्धव ठाकरेंना थेट आव्हान

रायगड : पोलीसनामा ऑनलाइन – Maharashtra Politics | शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Shivsena Chief Uddhav Thackeray) यांनी बुधवारी गटप्रमुखांच्या मेळाव्यात बोलताना एकनाथ शिंदे गट (Eknath Shinde Group) आणि भाजपवर (BJP) जोरदार हल्ला चढवला होता. शिंदे गट म्हणजे बाप चोरणारी टोळी असल्याचा घणाघाती आरोप त्यांनी केला होता. तसेच निवडून यायचं असेल तर स्वत:च्या हिंमतीवर निवडून या, बाळासाहेबांचा (Balasaheb Thackeray) फोटो कशाला वापरता? असा सवाल उद्धव ठाकरे यांनी केला होता. या टीकेला शिदे गटाचे आमदार आणि मंत्री दादा भुसे (Minister Dada Bhuse) यांनी प्रत्युत्तर दिले आहे. बाळासाहेबांच्या फोटोवरुन महाराष्ट्रातील राजकीय वातावरण (Maharashtra Politics) तापताना दिसत आहे.

 

दादा भुसे म्हणाले, हिंदू हृदयसम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे हे सगळ्या शिवसैनिकांना (Shiv Sainik) पित्यासमान आहेत. सरकारने त्यांना कायदेशीररित्या राष्ट्रीय पुरुष (Legally National Men) म्हणून संबोधले आहे. तसा जीआर (GR) देखील काढण्यात आला असल्याचे भुसे यांनी सांगितले. दादा भुसे हे रायगडमध्ये जिल्हा कार्य़कारिणी आढावा बैठकीसाठी आले होते, त्यावेळी त्यांनी माध्यमांशी संवाद साधला.

 

दादा भुसे म्हणाले, देशाचे पिता, दैवत छत्रपती शिवाजी महाराज (Chhatrapati Shivaji Maharaj) आहेत.
फोटोच काढण्याचा विषय असेल तर उद्धव ठाकरे यांनी छत्रपती शिवाजी महाराजांचा फोटो काढून जनतेच्या दरबारात जाऊन दाखवावं, असं थेट आव्हान भुसे यांनी उद्धव ठाकरे यांना दिले आहे.
यावर आता शिवसेनेकडून कशा प्रकारे प्रत्युत्तर (Maharashtra Politics) दिले जाते हे पहावे लागले.

 

दरम्यान, राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची (MNS) स्थापना केल्यानंतर सुरुवातीच्या काळात मेळावे,
जाहीर सभा आणि पोस्टरवर बाळासाहेब ठाकरे यांचा फोटो असायचा.
मात्र, त्यावेळी बाळासाहेबांनी आपले फोटो लावू नका, असं राज ठाकरे यांना स्पष्ट सांगितले होते.
त्यानंतर मात्र मनसेच्या कोणत्याही पोस्टरवर बाळासाहेबांचा फोटो दिसला नाही.

 

Web Title :- Maharashtra Politics | eknath shinde camp dada bhuse reacts on uddhav thackeray criticism of using balasaheb photo update

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

Maharashtra Politics | खासदार भावना गवळींचे उद्धव ठाकरेंना प्रत्युत्तर, कालपर्यंत मी त्यांची ताई होते, आज लगेच बाई झाले

Buldhana Poisoning Case | भगर पीठ खाल्याने 20 जणांना विषबाधा, बुलढाणा मधील घटना

Satara ACB Trap | 2 हजार रुपये लाच घेताना तहसील कार्यालयातील कारकुन आणि खासगी इसम अँन्टी करप्शनच्या जाळ्यात