Maharashtra Politics | ‘2013 आणि 2018 साली शिवसेनेत लोकशाही पद्धतीने…’, शिंदे गटाचा उद्धव ठाकरेंवर पलटवार

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – Maharashtra Politics | देशात लोकशाही आहे, असं आपण मानतो, तर पक्षांतर्गत सुद्धा लोकशाही (Democracy) आहे. पक्ष फक्त दोनच पातळीवर असतो. एक विधिमंडळ आणि दुसरं संसदीय आणि त्यापलीकडे मोठा पक्ष रस्त्यावर असतो. जो पक्ष आपला नेता, आपली घटना (Maharashtra Politics) पाळतो, जी घटना शिवसेनेला (Shivsena), त्यानुसार निवडणुका होतात, असं शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Shiv Sena Chief Uddhav Thackeray) यांनी म्हटलं होतं. मात्र, उद्धव ठाकरेंचं हे विधान दिशाभूल करणार आहे, असा पलटवार शिंदे गटाने (Shinde Group) केला आहे.

शिंदे गटाचे खासदार राहुल शेवाळे (MP Rahul Shewale) यांनी दिल्लीत माध्यमांशी बोलताना म्हणाले, उद्धव ठाकरे यांनी सहानुभूती मिळवण्यासाठी पत्रकार परिषद घेतली. शिवसेनेच्या घटनेसंदर्भात (Constitution) उद्धव ठाकरेंनी दिलेली माहिती दिशाभूल करणारी आहे. 2013 आणि 2018 साली शिवसेनेच्या घटनेत दुरूस्ती करण्यात आली. त्यात शिवसेना प्रमुख पद अबाधित ठेवले. पक्षप्रमुख हे नवीन पद तयार केले. (Maharashtra Politics)

बाळासाहेब ठाकरे (Balasaheb Thackeray) यांनी 1998 साली निवडणूक आयोगाला (Election Commission) हमी दिली होती, की पक्षात लोकशाही पद्धत राबवण्यात येईल. पण 2013 आणि 2018 साली झालेल्या पक्षाच्या निवडणुकीत (Party Elections) लोकशाही पद्धत राबवली नाही. उद्धव ठाकरे यांच्या पक्षप्रमुख पदाबद्दल कोणताही आक्षेप नाही. परंतु, शिवसेना नेते, उपनेते, विभागप्रमुख, संपर्क प्रमुख, जिल्हा प्रमुख, पदांसाठी कोणतेही मतदान पार पडलं नाही. मुंबईतील गटप्रमुखांनी कधीच मतदान केले नसल्याचे राहुल शेवाळे यांनी यावेळी सांगितले.

सुप्रीम कोर्टाने (Supreme Court) निर्णय दिल्यानंतर निवडणूक आयोगाची कार्यवाही सुरु झाली.
हा सुप्रीम कोर्टाचा निर्णय आहे, पण त्यांना दुर्दैवाने माहिती नाही.
निवडणूक आयोगाच्या निर्णयामध्ये कुठलेही कोर्ट हस्तक्षेप करत नाही.
जर निवडणूक प्रक्रिया राबवली असेल तर पुरावे द्यावे. सहानुभूती निर्माण करण्यासाठी पत्रकार परिषद
घेतली असल्याची टीका राहुल शेवाळे यांनी केली.

Web Title :-  Maharashtra Politics | eknath shinde camp rahul shewale deepak kesarkar targets uddhav thackeray over shivsena issue

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Pune Traffic Updates News | मेट्रोच्या कामामुळे विद्यापीठ चौकात होणारी वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी वाहतूकीत बदल, जाणून घ्या पर्यायी मार्ग

Crime News | कोरोना, लॉकडाऊनपासून बंद पडलेल्या पण आता सुरू झालेल्या ‘एमओबी’मध्ये 20 गुन्हेगारांची ‘परेड’

Pune Crime News | सराईत वाहनचोराच्या गुन्हे शाखेने आवळल्या मुसक्या, 6 गुन्हे उघडकीस