Maharashtra Politics | ‘बाळासाहेबांच्या प्रत्येक गोष्टीवर आमचा अधिकार’, शिंदे गटातील ‘या’ आमदाराचे विधान!

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – Maharashtra Politics | शिवसेनेतील उभ्या फुटीनंतर उद्धव ठाकरे व एकनाथ शिंदे गटामध्ये अनेक प्रकरणांवरून वातावरण तापत आहे. आमचीच खरी शिवसेना (Shivsena) आहे, असा संघर्षमय दावा दोन्ही पक्षांकडून वारंवार होताना (Maharashtra Politics) दिसत आहे.

 

दरम्यान, हा संघर्ष सुरू असतानाच दि. २८ डिसेंबर रोजी मुंबई महापालिकेत (Brihanmumbai Municipal Corporation (BMC) या दोन्ही गटांत राडा झाला. उद्धव ठाकरे गटाच्या (Uddhav Thackeray Group) लोकप्रतिनिधींचे दुर्लक्ष असताना एकनाथ शिंदे गटाच्या (Eknath Shinde Group) पदाधिकाऱ्यांनी महापालिका मुख्यालयातील पक्ष कार्यालय ताब्यात घेण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे महापालिकेतील मुख्यालयात काही काळ तणाव (Maharashtra Politics) निर्माण झाला होता. या प्रकरणावरून “आम्ही बाळासाहेब ठाकरे (Balasaheb Thackeray) यांच्या सर्वच गोष्टींवर अधिकार सांगणार आहोत,” असे शिंदे गटातील आमदार संजय गायकवाड (MLA Sanjay Gaikwad) म्हणाले. ते आज एका वृत्तवाहिनीशी बोलत होते.

 

“बाळासाहेब ठाकरे यांनी आम्हा शिवसैनिकांना कडवट हिंदुत्वाच्या (Hindutva) विचारांसह लढणं शिकवलं. शेतशिवारातील शिवसैनिक आज आमदार झाला आहे. याच विचारांवर अनेकजण मोठे झाले आहेत; परंतु बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांना तिलांजली दिली. बाळासाहेब ठाकरे म्हणाले होते की, ज्यावेळी मी काँग्रेस (Congress) पक्षात सामील होण्याचा विचार करेन, त्यावेळी मी माझा पक्ष बंद करेन. त्याच काँग्रेस व राष्ट्रवादी (NCP) पक्षाबरोबर उद्धव ठाकरे यांची सेना हातमिळवणी करून बसली आहे. यामुळे बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांची अवहेलना होताना दिसत आहे,” असा दावाही संजय गायकवाड यांनी केला.

आमचा पक्ष आता मोठा आहे. आमच्याबरोबर 40 आमदार व 13 खासदार आहेत. यामुळे तर आम्हाला बाळासाहेबांची शिवसेना (Balasaheb’s Shiv Sena) हे नाव मिळाले. बाळासाहेबांच्या ज्या काही गोष्टी असतील त्यावर आमचा अधिकार आम्ही सांगत आहोत, असेही गायकवाड यांनी सांगितले.

 

महापालिकेतील कार्यालयात झालं तरी काय?
उद्धव ठाकरे गटातील लोकप्रतिनिधींचे दुर्लक्ष असताना एकनाथ शिंदे गटामधील पदाधिकारी मुंबई महापालिकेतील
शिवसेना पक्षाच्या कार्यालयात घुसल्याने काही काळ त्या ठिकाणी तणाव निर्माण झाला होता.
दरम्यान, उद्धव ठाकरे गटाचे पदाधिकारी, माजी नगरसेवक महापालिकेतील मुख्यालयात जमा झाले.
दोन्ही गट एकमेकांसमोर आल्याने कार्यकर्त्यांमध्ये घोषणाबाजी, अरेरावी, धक्काबुक्की झाली.
अखेर सुरक्षारक्षकांनी सर्वांना कार्यालयाबाहेर काढल्यानंतर हा राडा तात्पुरता थांबला.
एकनाथ शिंदे गटातील पदाधिकाऱ्यांसह खासदार राहुल शेवाळे (MP Rahul Shewale)
व माजी स्थायी समिती अध्यक्ष यशवंत जाधव (Standing Committee Chairman Yashwant Jadhav)
पालिका मुख्यालयातील पक्ष कार्यालयात गेले होते.

 

Web Title :- Maharashtra Politics | eknath shinde group mla sanjay gaikwad sai going to claim all things of balasaheb thackeray

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

MLA Siddharth Shirole | खडकीसह सहा कॅन्टोन्मेंट बोर्डांच्या विकासासाठी दरवर्षी निधी द्यावा; आमदार शिरोळे यांची मागणी

Nana Patole | महाराष्ट्र सरकारनेही राज्यात जातनिहाय जनगणना करावी – नाना पटोले

Ambadas Danve | विदर्भाच्या विकासासाठी घोषणा नको तर कृती करा; विरोधी पक्षनेते अंबादास दानवेंनी मांडली भूमिका