Maharashtra Politics | खासदार भावना गवळींचे उद्धव ठाकरेंना प्रत्युत्तर, कालपर्यंत मी त्यांची ताई होते, आज लगेच बाई झाले

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – Maharashtra Politics | ज्यांच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप केले. त्यांना आता क्लिन चीट दिली जात आहे. मला पंतप्रधानाचे (PM Narendra Modi) आश्चर्य वाटते, ज्या बाईवर आरोप केले तिच बाई तुम्हाला राखी बांधायला मिळाली का, असा थेट सवाल करत उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी कालच्या मुंबईतील जाहीर सभेत भावना गवळी (Bhavna Gawli) यांच्यावर निशाणा साधला होता. यावर आता शिंदे गटातील खासदार भावना गवळी यांनी प्रत्युत्तर दिले आहे. (Maharashtra Politics)

 

भावना गवळी यांनी म्हटले की, कालपर्यंत मी त्यांची ताई होते आज बाई झाले. रक्षाबंधनसारख्या पवित्र नात्याचे कुणीही राजकारण करू नये. मागील अनेक वर्षांपासून मी माझ्या मतदार संघातील एक लाखा पेक्षा जास्त बांधवांना राख्या पाठवते. या आधीही मी अनेक मंत्री, माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी (Former Prime Minister Atal Bihari Vajpayee) यांनाही राखी बांधली आहे.

 

भावना गवळी म्हणाल्या, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Deputy Chief Minister Devendra Fadnavis) यांनी संकटकाळात मदत केली. म्हणून मी त्यांना साथ दिली. उद्धव ठाकरे नैराश्यातून अशी विधाने करत आहेत. (Maharashtra Politics)

 

दरम्यान, खासदार भावना गवळी यांच्यावर उद्धव ठाकरे यांनी केलेल्या टीकेला
केंद्रीय मंत्री नारायण राणे (Union Minister Narayan Rane) यांनी देखील प्रत्युत्तर दिले आहे.
त्यांनी म्हटले की, भावना गवळींच्या वडिलांनी आयुष्य शिवसेनेसाठी (Shivsena) घालवले.
भावना गवळी तर लहान असल्यापासून खासदार आहेत. त्यांच्यावर मोदींना राखी बांधण्यावरून टीका केली.
तुम्हाला राखी बांधण्याचे काय महत्व असणार.
ज्या महिलेने शिवसैनिकांचे नेतृत्व केले, एवढी वर्षे तिने पक्षाची सेवा केली, तिच्याविरोधात असे बोलतात.

 

Web Title :- Maharashtra Politics | eknath shinde group mp bhavana gawali replied shivsena uddhav thackeray criticsm

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

Narayan Rane On Uddhav Thackeray | उद्धव ठाकरेंच्यामागे ईडी लागणार; नारायण राणे यांनी थेट दिला इशारा, आत जाल…

Chandrashekhar Bawankule | उद्धव ठाकरेंना आपल्या परिवाराशिवाय कोणीच दिसत नाही, चंद्रशेखर बावनकुळेंची टीका

IND vs AUS | भारत-ऑस्ट्रेलिया मॅचच्या तिकीट खरेदीसाठी रांग ! चाहत्यांवर लाठीचार्ज