Maharashtra Politics | उद्धव ठाकरेंच्या दौर्‍याचा शिंदे गटाने घेतला धसका, शेतकर्‍यांच्या विषयावरही राजकारण, ’असा’ असतो Event! म्हणत उडवली खिल्ली

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – Maharashtra Politics | राज्यातील शेतकर्‍याचे अतिवृष्टीमुळे प्रचंड (Rain in Maharashtra) नुकसान झाले आहे. यामुळे दिवाळीच्या सणात (Diwali Festival) देखील शेतकरी चिंतातुर आहे. ओला दुष्काळ जाहीर करण्यास शिंदे-फडणवीस सरकारने (Shinde-Fadnavis Government) स्पष्ट नकार दिल्याने शेतकरी हवालदिल झाला आहे. हातातोंडाशी आलेले पीक पाण्यात भिजल्याने आर्थिक संकटाचा सामना करणार्‍या शेतकर्‍यांच्या प्रश्नावरही राजकारण (Maharashtra Politics) सुरू असल्याचे विदारक चित्र सध्या राज्यात दिसत आहे. शेतकर्‍यांच्या नुकसानीची पाहणी करण्यासाठी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी दौरा काढल्यानंतर शिंदे गट आणि भाजपाने (BJP) त्यांच्या दौर्‍याची खिल्ली उडवण्यास सुरूवात केली आहे. शिंदे गटाचे (Shinde group) मंत्री उदय सामंत (Minister Uday Samant) यांनी महाराष्ट्रातील जनतेला पत्र लिहिले असून यात शेतकर्‍यांसाठी काय-काय केले हे नमूद केले आहे.

 

शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे सध्या औरंगाबाद जिल्ह्याच्या दौर्‍यावर आहेत. ते शेतकर्‍याच्या बांधवावर जाऊन नुकसानीची पाहणी करून त्यांची विचारपूस करत आहेत. मात्र, ठाकरेंच्या दौर्‍याचा धसका घेतलेले सत्ताधारी त्यांच्या दौर्‍याचे राजकारण (Maharashtra Politics) करून खिल्ली उडवताना दिसत आहेत.

 

शिंदे गटाचे मंत्री उदय सामंत यांनी महाराष्ट्रातील जनतेला लिहिलेल्या पत्रात ठाकरे यांची खिल्ली उडवताना म्हटले आहे की, सत्ता गेल्यानंतरचा हा उद्धव ठाकरेंचा पहिलाच दौरा आहे. ते मातोश्रीतून (Matoshree) बाहेर पडून आपल्या लग्झरी कारमध्ये बसून नंतर प्रायव्हेट चार्टर्ड विमानाने संभाजीनगर पोहचतील. दौर्‍यानिमित्त लार्जर दॅन लाईफ अशी प्रतिमा उद्धव ठाकरेंची दिसली पाहिजे याची काळजी त्यांचे फोटोग्राफर इव्हेंट करताना घेतील.

उदय सामंत यांनी पुढे म्हटले आहे की, लग्झरी कारने शेतकर्‍यांच्या बांधावर जाऊन ते फोटोसेशन करतील. या संपूर्ण दौर्‍यात त्यांच्यासमावेत कानात खुसफुसणारे, कायम त्यांच्या मागे पुढे नाचणारे, शेतीचे पूर्ण ज्ञान नसलेले. शेतकर्‍यांबाबत शून्य कळकळ असलेले सर्व बडवे सोबत असतील. हे बडवे शेतकर्‍यांना उद्धव ठाकरेंच्या जवळ येणे सोडाच बोलू देखील देणार नाहीत. स्वत:चे महत्त्व वाढवण्यासाठी शेतकर्‍यांच्या सगळ्या समस्या हे बडवेच उद्धव ठाकरेंना सांगतील.

 

या पत्रात पुढे म्हटले आहे की, केवळ प्रसिद्धीच्या हवास्यापोटी केलेल्या लग्झरी दौर्‍यात उद्धव ठाकरे स्वत:चा छंद जोपासून शेतकर्‍यांचे फोटो काढतील.
त्यानंतर मुंबईत फोटोचे प्रदर्शन भरवून सेलेब्रिटींना आमंत्रण दिले जाईल. सेलिब्रिटी येतील. प्रदर्शन पाहतील.
उद्धव ठाकरेंच्या फोटोचे कौतुक करतील. त्यानंतर मातोश्रीवरील बडवे शिवसेना नेत्यांना व शिवसैनिकांना प्रदर्शनातील फोटो बोली लावून खरेदी करण्याचे आदेश देतील.
परंतु आदेश पाळणारे आणि बाळासाहेबांचे विचार हृदयात असणारे शिवसैनिक तिथे राहिले नाही याची सर्वांना जाणीव आहे.

 

तुमचे शेतकर्‍यांच्या बांधावरचे दौरे नक्की कसे असतात हे आमच्यापेक्षा जास्त कुणाला माहिती
नसेल म्हणून सर्वसामान्य जनतेच्या माहितीसाठी तुमच्या दौर्‍याचे प्रवासवर्णन केले.
आज खर्‍या अर्थाने शेतकर्‍यांचे अश्रू पुसणारे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांच्यासोबत आहेत.
त्यामुळे बळीराजाची काळजी घ्यायला बाळासाहेबांची शिवसेना समर्थ आहे, असे सामंत यांनी म्हटले आहे.

 

Web Title :- Maharashtra Politics | event is like this balasahebs shivsena criticizes uddhav thackerays visit at aurangabaad

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

Pune Crime | सोनं दुप्पट करून देण्याच्या आमिषाने पथारी व्यावसायिक महिलेला भरदिवसा गंडा, फडके हौद परिसरातील घटना

Uddhav Thackeray | धीर सोडू नका, मदतीसाठी सरकारला भाग पाडू; बळीराजाने उद्धव ठाकरेंच्या हाती दिला ‘आसूड’

Maharashtra Politics | भाजप-शिंदे गट-मनसे युतीबाबत राजू पाटील यांनी स्पष्टच सांगितले, म्हणाले – ‘वेळ आली आणि राज ठाकरे यांनी…’