Maharashtra Politics | शिंदे गटला पहिला धक्का, ठाण्यातील माजी नगरसेविकेची पुन्हा घरवापसी

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – Maharashtra Politics | राज्यात सत्तांतर झाल्यानंतर एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांनी मुख्यमंत्री तर देवेंद्र फडणवीस (DyCM Devendra Fadnavis) यांनी उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली. एकनाथ शिंदे आणि त्यांच्या समर्थक आमदारांनी बंड केल्याने शिवसेनेत (Shivsena) दोन गट पडले. यानंतर दोन्ही गटांनी एकमेकांचे (Maharashtra Politics) पदाधिकारी खेचण्याची चढाओढ सुरु झाली. यात एकनाथ शिंदे यांचा बालेकिल्ला असलेल्या ठाण्यातील पदाधिकाऱ्यांनी शिंदे गटात (Shinde Group) प्रवेश केला. मात्र, याच ठिकाणी शिंदे गटला पहिला धक्का बसला आहे.

 

ठाण्यात शिंदे गटातील माजी नगरसेविकेने पुन्हा उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांना भेटून स्वगृही परतण्याचा निर्णय घेतला आहे. माजी नगरसेविका रागिणी बैरीशेट्टी (Ragini Bairisshetty) आणि भास्कर शेट्टी (Bhaskar Shetty) यांनी शिवसेना ठाकरे गटात (Shiv Sena Thackeray Group) प्रवेश केला आहे. मातोश्रीवर जाऊन बैरीशेट्टी कुटुंबाने उद्धव ठाकरेंच्या उपस्थितीत पुन्हा शिवसेना ठाकरे गटात प्रवेश केला. त्यामुळे निवडणुकीच्या आधीच शिंदे गटला धक्के बसण्यास सुरुवात झाल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरु झाली आहे.

 

दरम्यान शिवसेना ठाकरे गटाच्या माजी नगरसेविका ज्योती माने (Former corporator Jyoti Mane)
यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत सोमवारी सहकाऱ्यांसह शिंदे (Maharashtra Politics) गटात प्रवेश केला.
या प्रवेशाने ठाकरे गटाला धक्का बसला होता. महापालिका निवडणुकी पूर्वी असे धक्के बसणार असल्याचे संकेत शिंदे गटाने दिले होते.

शिंदे गट आणि ठाकरे गट या दोन्ही गटांतील नेत्यांनी आपली शिवसेना अधिक बळकट करण्यासाठी कंबर कसली आहे.
विशेष म्हणजे आता एकमेकांच्या कार्यकर्त्यांची पळवापळवी सुरु झाली आहे.
शिवसेनेत दोन गट झाल्याने रस्सीखेच वाढली असून कार्यकर्त्यांना अच्छे दिन आले आहेत.

 

Web Title :- Maharashtra Politics | first blow to eknath shinde group former corporator ragini bairisetty returns to uddhav thackeray shivsena group

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

Sanjay Raut | ‘शिवसेना आगामी काळात मोठा लढा उभा करेल’ – संजय राऊत

Rajiv Gandhi Case | राजीव गांधी हत्या प्रकरणातील दोषींची सुटका करा, सर्वोच्च न्यायालयाचे आदेश

Jitendra Awhad | “इतिहासाचे विकृतीकरण नको…”; राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जितेंद्र आव्हाड यांची प्रतिक्रिया