Maharashtra Politics | वरळीत आदित्य ठाकरेंना मोठा धक्का, माजी नगरसेवकाचा शिंदे गटात प्रवेश

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – Maharashtra Politics | आगामी मुंबई महापालिका निवडणुकीच्या (BMC Election) पार्श्वभूमीवर सर्वच पक्षांकडून मोर्चे बांधणी केली जात आहे. याच दरम्यान शिवसेना आमदार आदित्य ठाकरे (Shiv Sena MLA Aaditya Thackeray) यांना त्यांच्याच मतदारसंघात (Maharashtra Politics) मोठा धक्का बसला आहे. वरळीतील शिवसेनेचे माजी नगरसेवकर अॅड. संतोष खरात (Former Corporator Adv. Santosh Kharat) यांनी बाळासाहेबांची शिवसेना (Balasaheb’s Shiv Sena) या पक्षात प्रवेश केला आहे.

 

अॅड. संतोष खरात यांनी एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) गटात प्रवेश केल्यामुळे उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्या शिवसेनेला मोठा धक्का बसल्याचे बोलले जात आहे. खरात हे वरळीतील वॉर्ड क्र.195 मधील नगरसेवक होते. त्यांनी 2017 मध्ये महापालिकेची निवडणूक जिंकली होती. भाजपच्या (BJP) उमेदवाराचा मोठ्या फरकाने पराभव करुन खरात यांनी विजय मिळवला होता. (Maharashtra Politics)

 

वरळी हा शिवसेनेचा (ठाकरे गट) बाल्लेकिल्ला आहे. तसेच आमदार आदित्य ठाकरेंचा हा मतदारसंघ आहे.
याच मतदारसंघातील माजी नगरसेवक संतोष खरात यांनी शिंदे गटात (Shinde Group) प्रवेश केला आहे.
काही दिवसांपूर्वी विक्रोळी पार्कसाईट येथील शिवसेनेच्या माजी नगरसेविका डॉ. भारती बावदाने (Former Corporator Dr. Bharti Bawdane) यांनी आपल्या पतीसह शिंदे गटात प्रवेश केला होता. त्यामुळे शिंदे गटात गेलेल्या माजी नगरसेवकांची संख्या सहा झाली आहे.

 

Web Title :- Maharashtra Politics | former corporator of shivsena from worli santosh kharat in shinde group mumbai

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

Amyra Dastur | अभिनेत्री अमायरा दस्तूरच्या ‘या’ लूकने चाहत्यांना लावले वेड

Maharashtra Political Crisis | शिवसेना कुणाची? यावर आज निवडणुक आयोगापुढे महत्वाची सुनावणी

Priyanka Chaturvedi | शिवसेना ठाकरे गटाच्या खासदार प्रियंका चतुर्वेदींचे शिंदे गटावर जोरदार टीकास्त्र; म्हणाल्या…