Maharashtra Politics | राज्यपाल नियुक्त 12 आमदारांच्या नियुक्त्यांना सुप्रीम कोर्टाकडून 21 मार्चपर्यंत स्थगिती

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – Maharashtra Politics | महाराष्ट्रातील राज्यपाल नियुक्त 12 आमदारांच्या नियुक्तीचे प्रकरण सध्या सुप्रीम कोर्टात प्रलंबित आहे. त्यांची सुनावणी आता लांबणीवर पडली आहे. 24 फेब्रुवारी म्हणजे आज याचिकेवर सुनावणी होणार होती, पण सुप्रीम कोर्टाने आता पुढील तारीख दिली आहे. या प्रकरणाची पुढील सुनावणी आता 21 मार्च रोजी होणार आहे. त्यामुळे आता 21 मार्चपर्यंत राज्यपालांना 12 आमदारांच्या नियुक्त्या करता येणार नाहीत. (Maharashtra Politics)

जून 2020 पासून महाराष्ट्रामध्ये राज्यपाल नियुक्त 12 आमदारांचा प्रश्न राजकीय दृष्ट्या गाजत आहे. यावरून महाराष्ट्र्राचे राजकारण मोठ्या प्रमाणात तापले होते. महाराष्ट्रात सरकार बदलले पण हे प्रकरण अजूनही प्रलंबित आहे. महाविकास आघाडी सरकारच्या काळामध्ये राज्यपाल भगतसिंह कोश्यारी याबाबत निर्णय घेत नव्हते, त्यामुळे महाविकास आघाडी सरकारने याबाबत कोर्टात याचिका दाखल केली होती. आता सरकार बदलल्यानंतर याबाबत एक वेगळी याचिका दाखल झाली आहे. राज्यपालांनी मुख्यमंत्र्यांच्या सांगण्यावरून आधीची यादी परत पाठवली… हे कृत्य नियमात बसणारं नाही, असं म्हणत याबाबत कोर्टात आक्षेप घेण्यात आला आहे. (Maharashtra Politics)

सध्या विधान परिषदेमध्ये शिवसेनेच्या नीलम गोऱ्हे या सभापती आहेत.
सभापती बदलण्यासाठी आवश्यक संख्याबळ अजूनही भाजपकडे नाही आहे.
ते आता 12 आमदारांच्या नियुक्तीवर अवलंबून असेल.
सुप्रीम कोर्टाने या प्रकरणाची सुनावणी पुढे ढकलल्यामुळे राज्यपाल नियुक्त 12 आमदारांचा प्रश्न पुन्हा लांबणीवर पडला आहे.
सुप्रीम कोर्टाच्या निर्णयानुसार 21 मार्चपर्यंत राज्यपालांना 12 आमदारांच्या नियुक्त्या करता येणार नाहीत.

महाविकास आघाडीची यादी मागे
राज्यात महाविकास आघाडीचे सरकार कोसळून शिंदे-फडणवीस सरकार सत्तेत आल्यानंतर त्यांनी महाविकास आघाडीने दिलेल्या 12 सदस्यांची यादी मागे घेण्याचा निर्णय घेतला.
आता शिंदे सरकारकडून नवीन यादी सादर करण्याची तयारी सुरू करण्यात आली आहे.

Web Title :- Maharashtra Politics | governor nominated mlc 12 members issue supreme court cm eknath shinde uddhav thackeray

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Paresh Rawal | ‘हेरा फेरी 3’ या चित्रपटाचा टीझर शूट संपन्न; चित्रपटात पाहायला मिळणार अनेक ट्विस्ट

Ahmadnagar Crime News | रात्री आडोशाला बसून दारू पिणे पडले महागात; काय आहे नेमके प्रकरण?