Maharashtra Politics | मुंबई महापालिकेच्या कारभाराची कॅग मार्फत चौकशी, कोरोनातील दोन वर्षातील कामाच्या तपासणीचे राज्य सरकारचे आदेश

मुंबई : Maharashtra Politics | कोरोना काळात झालेल्या कामांच्या वाटपाची कॅग CAG (कॅन्टोलर ऑफ ऑडिटर जनरल ऑफ इंडिया – Cantor of Auditor General of India) या स्वायत्त संस्थेच्या माध्यमातून मुंबई महापालिकेची (Mumbai Municipal Corporation (BMC ) चौकशी करण्याचे आदेश राज्य सरकारने (State Government) दिले आहेत. (Maharashtra Politics)

महापालिकेने कोरोना काळात (Corona Period) केलेल्या १२ हजार कोटी रुपयांच्या ७६ कामांची चौकशी करण्याची राज्य शासनाची विनंती कॅगने मान्य केली आहे. त्यात कोरोना काळातील ३ रुग्णालयावर झालेल्या ९०४ कोटी रुपयांच्या खर्चाचा समावेश आहे.

मुंबई महानगरपालिकेतील कोरोना केंद्राचे वाटप, त्यासाठी लागणार्‍या वस्तूंची झालेली खरेदी,
त्याचे नियमबाह्य पद्धतीने झालेले कामाचे वाटप हे सारे चौकशीच्या फेर्‍यात आणले जाणार आहे.
कोरोना काळात लोकांची गैरसोय होऊ नये, यासाठी टेंडर प्रक्रिया न राबविता तातडीने सोयी सुविधा उभारण्याला आणि वस्तूंची खरेदी करण्याला प्राधान्य देण्यात आले होते. मात्र, या अधिकाराचा गैरवापर करुन मोठ्या प्रमाणावर भ्रष्टाचार (Corruption) झाल्याचा आरोप भारतीय जनता पक्षाकडून (BJP) सातत्याने केला जात आला आहे. (Maharashtra Politics)

या आरोपातील सत्यता जनतेसमोर यावी यासाठी लवकरात लवकर कॅगमार्फत या सर्व प्रकरणांची चौकशी
करुन अहवाल सादर करण्याचे आदेश राज्य सरकारने कॅगला दिले आहेत.

महापालिका निवडणुकीची रणधुमाळी जवळ येत असताना आता भाजपने उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray)
यांच्यावर निशाणा साधण्यासाठी आणखी एक हत्यार उपसले आहे.

Web Title :- Maharashtra Politics | Investigation of Mumbai Municipal Corporation’s affairs through CAG, state government’s order to investigate the work of two years in Corona

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा