Maharashtra Politics Issue | महाराष्ट्रातील सत्तासंघर्षाची सुनावणी पुढे ढकलली, पुढील सुनावणी 14 फेब्रुवारी रोजी

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – Maharashtra Politics Issue | महाराष्ट्रातील शिंदे-फडणवीस यांचे सरकार स्थापन झाल्यापासून सुप्रीम कोर्टात ठाकरे विरुद्ध शिंदे गटातील (Shinde Group) सत्तासंघर्षाची सुनावणी सुरू आहे. आज (मंगळवार) सुप्रीम कोर्टात (Supreme Court) 16 आमदारांच्या अपात्रते संदर्भात सुनावणी झाली. सरन्यायाधीश वाय.एस. चंद्रचूड (Chief Justice Y.S. Chandrachud) यांच्या अध्यक्षतेखाली पाच सदस्यीय खंडपीठासमोरच आजची सुनावणी झाली. यावेळी महाराष्ट्रातील सत्तासंघर्षाची (Maharashtra Politics Issue) सुनावणी पुढे ढकलण्यात आली. आता पुढील सुनावणी 14 फेब्रुवारी रोजी होणार आहे.

ठाकरे गटाने (Thackeray Group) हे प्रकरण 7 न्यायमूर्तींच्या पीठाकडे द्या, अशी मागणी केली.
यामागील महत्त्वाचे कारण म्हणजे पीठासीन अधिकाऱ्यांविरोधात अविश्वास प्रस्ताव प्रलंबित असेल तर त्यांना कारवाईचा अधिकार आहे की नाही हा या सगळ्या प्रकरणातील कळीचा मुद्दा आहे.
2016 मध्ये अरुणाचल प्रदेशातील नबाम रेबिया केसमध्ये (Nabam Rabies Case) सुप्रीम कोर्टाच्या पाच न्यायमूर्तींच्या पीठानं महत्त्वाचा निकाल दिला आहे.
अविश्वास प्रस्ताव प्रलंबित असताना पीठासीन अध्याक्षांना कारवाईचा अधिकार नाही, असं या निकालात नमूद केलं आहे.
शिंदे गटाने याच निकालाचा आधार घेत, उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ (Narhari Zirwal) यांना अपात्रतेबाबत कारवाईचा अधिकार नाही, असे म्हटलेय. (Maharashtra Politics Issue)

ठाकरे गटाचे वकील कपिल सिब्बल (Adv. Kapil Sibal) यांनी युक्तीवाद केला.
मागच्या सुनावणीवेळी आम्ही नबाम राबिया खटल्याचा दाखला दिला होता.
तसेच हे प्रकरण सात न्यायाधीशांच्या खंडपीठासमोर न्यावे, अशी विनंती केल्याची आठवण सिब्बल यांनी
करुन दिली. त्यानंतर न्यायाधीशांनी सॉलिसिटर जनरल आणि शिंदे गटाचे वकील हरिश साळवे
(Adv. Harish Salve) यांचे मत घेऊन ही सुनावणी 14 फेब्रुवारी रोजी होणार असल्याचे म्हटले आहे.

Web Title :- Maharashtra Politics Issue | next hearing of maharashtra political crisis is on february 14 2023 uddhav thackeray cm eknath shinde shiv sena supreme court

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Maharashtra Politics | शिंदे-फडणवीस सरकारमधील भ्रष्टचाराचा आरोप झालेल्या मंत्र्यांवर सामनातून जहरी टीका…

Amruta Fadnavis | अमृता फडणवीसांचे उर्फी जावेदबद्दल मोठे विधान; म्हणाल्या – ‘उर्फी जे करतेय, त्यात काहीच वावगं नाही’

Urfi Javed | उर्फी जावेदने चित्रा वाघ यांना पुन्हा डिवचलं! स्वत:च्या अंतर्वस्त्राचा उल्लेख करत म्हणाली – ‘…चित्रा वाघ ग्रेट है’