Maharashtra Politics | ‘शिवसेनेत दोन गट पाडण्यामागे भाजपचंच मिशन’, जाहीर सभेत भाजपच्या बड्या मंत्र्याने दिली कबुली

जळगाव : पोलीसनामा ऑनलाइन – Maharashtra Politics | शिवसेनेमध्ये (Shivsena) बंड झाल्यानंतर दोन गट तयार झाले. शिंदे गट (Shinde Group) आणि ठाकरे गट (Thackeray Group). एकनाथ शिंदे यांच्यासोबत 40-50 आमदारांनी स्वतंत्र गट तयार केला. यानंतर राज्यातील महाविकास आघाडीचे सरकार (Maha Vikas Aghadi Government) कोसळले. त्यानंतर राज्यात शिंदे गट आणि भाजप युतीचे सरकार स्थापन झाले. अशातच शिवसेनेत झालेल्या बंडामागे भाजपचा (BJP) हात असल्याचा दावा ठाकरे गट आणि महाविकास आघाडीकडून (Maharashtra Politics) करण्यात आला. आता याची कबुली भाजपच्या एका बड्या मंत्र्याने दिली आहे. यामुळे अनेकांच्या भुवया उंचावल्या असून राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे.

शिवसेनेत दोन गट पाडण्यामागे भाजपचंच मिशन असल्याचे गुपीत भाजपचे नेते आणि मंत्री गिरीश महाजन (Minister Girish Mahajan) यांनी सांगितले. जळगाव येथे एका सभेत बोलताना महाजन यांनी हे वक्तव्य केले. विशेष म्हणजे त्यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) आणि गुलाबराव पाटील (Gulabrao Patil) उपस्थित होते. जळगाव जिल्ह्यातील पाचोरा तालुक्यातील लोहारी येथे अखिल भारतीय बडगुजर समाजाचे अधिवेशन (Akhil Bhartiya Badgujar Samaj) झाले. या कार्यक्रमात बोलताना गिरीश महाजन यांनी शिवसेनेत दोन गट पाडण्यामागे भाजपचंच मिशन होतं, अशी कबुली दिली आहे.

गिरीश महाजन म्हणाले, एकनाथ शिंदे कसे मुख्यमंत्री झाले. या गोष्टीचा विचार केला तर आम्हालाही विश्वास बसत नव्हता. परंतु ऑपरेशन सुरु केलं. एकनाथजी पुढे निघाले आणि बघता बघता त्यांचं सर्व सैन्य त्यांच्या मागे गेलं आणि अखेर जमलंच. सारं जुळून आलं. घडून आलं, हे सांगत यामागे चामुंडा मातेचाही आशीर्वाद होता, असे महाजन म्हणाले. (Maharashtra Politics)

पुढारी कसे असतात, तुम्हाला माहिती आहे

हे सर्व मिशन सोपं नव्हतं. शिवसेनेसारख्या पक्षातून चाळीस आमदार बाहेर पडतात,
उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांना कंटाळून हे लोक बाहेर पडतात.
17-18 लोक घेऊन बाहेर पडायचं आणि 50 पर्यंत मजल मारायची, हे खूप कठीण होतं.
मध्येच जर मिशन फेल झालं तर करायचं काय? असं वाटत होतं. परंतु पुढारी कसे असतात, तुम्हाला माहिती आहे.
आम्ही कसे असतो, तुम्हाला माहिती आहे, असे म्हणताच उपस्थितांमध्ये हशा पिकला.

उद्धव ठाकरेंवर टीका

उद्धव ठाकरे यांच्यावर टीका करताना गिरीश महाजन म्हणाले, गेल्या अडीच वर्षाचा कारभार पाहिला तर,
मुख्यमंत्र्यांनी मंत्रालयाची पायरी देखील चढली नाही. घरून काम करतो.
कॉम्प्युटरवर काम करतो, असं काम त्यांनी केलं, असे म्हणत त्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासमोरच
उद्धव ठाकरेंवर टीकास्त्र सोडलं. तर दुसरीकडे मुख्यमंत्र्यांचे कौतुक करताना म्हणाले, किमान चार तास तरी झोपा,
मात्र ते तीन-तीन वाजेपर्यंत काम करतात, असे महाजन म्हणाले.

Web Title :- Maharashtra Politics | it is bjp mission to destroy two factions in shiv sena minister girish mahajan confessed cm eknath shinde uddhav thackeray maharashtra political crisis

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Sanjay Raut | शरद पवार आणि देवेंद्र फडणवीस यांच्या एकत्र प्रवासावर बोलले संजय राऊत; म्हणाले…

Amitabh Bachchan | महानायक अमिताभ बच्चन यांच्या ‘या’ कृत्यामुळे नेटकऱ्यांनी केले ट्रोल ; बिग बींनी चाहत्यांची मागितली माफी

Shripal Sabnis | राज्यपालांवर टीका करताना ज्येष्ठ साहित्यिक श्रीपाल सबनीस यांची जीभ घसरली, म्हणाले – ‘नालायक राज्यपाल, अवदसा येऊन…’