Maharashtra Politics | आव्हाडांनी औरंगजेबाचं मंदिर बनवावं अन् उद्घाटनाला…, शिंदे गटाच्या नेत्याचा घणाघात

ठाणे : पोलीसनामा ऑनलाइन – Maharashtra Politics | विरोधी पक्षनेते अजित पवार (Ajit Pawar) यांनी छत्रपती संभाजी महाराज (Chhatrapati Sambhaji Maharaj) हे धर्मवीर (Dharmaveer) नव्हते तर ते स्वराज्य रक्षक (Swaraj Rakshak) होते असे विधान हिवाळी अधिवेशनात (Winter Session) केले होते. अजित पवार यांच्या विधानानंतर विरोधक (Maharashtra Politics) आक्रमक झाले आहेत. दरम्यान, अजित पवार यांची बाजू लावून धरत असताना राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाड (NCP MLA Jitendra Awhad) यांनी औरंगजेब क्रूर आणि हिंदूद्वेष्टा नसल्याचे वादग्रस्त विधान केलं. आव्हाडांच्या या वक्तव्याचे पडसाद उमटण्यास सुरुवात झाली आहे.
जितेंद्र आव्हाड यांनी केलेल्या वादग्रस्त विधानावर भाजप (BJP) आणि शिंदे गटाच्या (Shinde Group) नेत्यांनी पलटवार केला आहे. शिंदे गटाचे प्रवक्ते नरेश म्हस्के (Naresh Mhaske) यांनी आव्हाडांवर घणाघाती टीका केली आहे. आव्हाड साहेबांसाठी वेगळा इतिहास कुणी लिहिला असेल तर माहिती नाही. आव्हाड आपल्या सोयीने इतिहास मांडतात. औरंगजेबाला हिंदू धर्माचा तिरस्कार होता. संभाजी राजांचे अतोनात हाल करत त्यांची औरंगजेबाने हत्या केली असं नरेश म्हस्के म्हणाले. (Maharashtra Politics)
नरेश म्हस्के पुढे म्हणाले, छत्रपती संभाजी महाराजांनी मुस्लीम धर्म स्वीकारला नाही आणि त्यांनी आपल्या प्राणांची आहुती दिली. मग त्यांना धर्मवीर म्हणायचं नाही का? असा सवाल म्हस्के यांनी विचारला आहे.
जितेंद्र आव्हाड यांच्या वादग्रस्त विधानाचा समचार घेताना नरेश म्हस्के म्हणाले,
जितेंद्र आव्हाडांनी औरंगजेबाचं एक मंदिर बनवावं आणि त्याच्या उद्घाटनाला अजित पवार (Ajit Pawar),
संजय राऊत (Sanjay Raut), उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांना बोलावावं.
अशा पद्धतीने औरंगजेबाचे उद्दात्तीकरण करणं योग्य नाही, अशी टीका नरेश म्हस्के यांनी केली.
Web Title :- Maharashtra Politics | jitendra awhad controversial statement on aurangzeb bjp shinde camp reacts
Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update
Ruhanika Dhawan | ‘या’ बालकलाकाराने केवळ वयाच्या 15 व्या वर्षी केले स्वतःचे घर खरेदी; पोस्ट वायरल