Maharashtra Politics | महाविकास आघाडीत बिघाडी? शिवसेनेच्या मैत्रिबाबत नाना पटोलेंचे धक्कादायक विधान, म्हणाले- ‘शिवसेना आमचा…’

0
1633
Maharashtra Politics | mahavikas aghadi break nana patoles shocking statement about his friendship with shivsena said shivsena is not our natural friend
file photo

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – भाजपला (BJP) सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी 2019 च्या विधानसभा निवडणुकीच्या (Assembly Elections) निकालानंतर राज्यात नाट्यमय (Maharashtra Politics) घडामोडी घडल्या. भाजप सोबत युती करुन लढलेल्या शिवसेनेने (Shivsena) राष्ट्रवादी (NCP) आणि काँग्रेस (Congress) यांच्यासोबत महाविकास आघाडी (Mahavikas Aghadi) करुन राज्यात सरकार (State Government) स्थापन केले. शिवसेनेचे पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी मुख्यमंत्री पदाची शपथ घेतली. मात्र, अडीच वर्षानंतर शिवसेनेत मोठे बंड झाले आणि ठाकरे सरकार कोसळले. तेव्हापासून महाविकास आघाडीमधील घटक पक्षांमध्ये धुसफूस (Maharashtra Politics) दिसत आहे. दरम्यान, काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले (Nana Patole) यांनी काँग्रेस आणि शिवसेनेच्या मैत्रिबाबत (Friendship) धक्कादायक विधान केले आहे. पटोले यांच्या या विधानामुळे दोन्ही पक्षांमधील संबंध बिघडण्याची शक्यता आहे.

 

नाना पटोले यांनी काँग्रेस आणि शिवसेनेमधील मैत्री आणि संभाव्य आघाडीबाबत म्हणाले, शिवसेना हा काही आमचा रेग्युलर पार्टनर (Regular Partner) नाही. भाजप आणि शिवसेनेची झालेली भांडणं आणि पहाटेचं बनलेलं सरकार हे सर्वांना माहिती आहे. म्हणून शिवसेना हा काही आमचा नैसर्गिक मित्र (Natural Friend) नाही. आमच्या विचारसणीसोबत (Maharashtra Politics) असतील तर ते आमचे मित्र. पण आता आपण पाहतोय की नुकत्याच झालेल्या क्रिकेट संघटनेच्या निवडणुकीत भाजपा, शिवसेना आणि राष्ट्रवादी हे एकत्र होते. आम्हाला अद्याप त्या गोष्टीचा संभ्रम आहे. भाजप ही देशाला बरबाद करणारी व्यवस्था आहे. त्यामुळे भाजपसोबत कुठलेही संबंध नसतील ते आमचे मित्र, असे नाना पटोले यांनी स्पष्ट केलं.

मुंबई क्रिकेट असोसिएशनच्या निवडणुकीत (Mumbai Cricket Association Election) भाजपचे आशिष शेलार (Ashish Shelar),
राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रमुख शरद पवार (NCP Chief Sharad Pawar) आणि शिवसेना ठाकरे गटाचे (Shiv Sena Thackeray Group)
मिलिंद नार्वेकर (Milind Narvekar) एकत्र आले होते. यावरुन नाना पटोले यांनी स्पष्ट शब्दात नाराजी व्यक्त केली होती.
दरम्यान, नाना पटोले यांनी केलेल्या मैत्रिच्या विधानाबाबत शिवसेना कशा प्रकारे प्रतिक्रिया देते हे पहावे लागले.
मात्र पटोले यांच्या विधानामुळे महाविकास आघाडीमध्ये काही अलबेल नसल्याचे दिसत आहे.

 

Web Title :- Maharashtra Politics | mahavikas aghadi break nana patoles shocking statement about his friendship with shivsena said shivsena is not our natural friend

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

7th Pay Commission | केंद्रीय कर्मचार्‍यांसाठी खुशखबर! 18 महिन्यांच्या DA एरियरबाबत आली मोठी माहिती

Central Government Employees News | सरकारी कर्मचार्‍यांसाठी IMP बातमी; GPF चा नियम बदलला, जाणून घ्या

Maharashtra Revenue And Forest Department Officers Transfer | अपर जिल्हाधिकारी संवर्गातील 8 अधिकार्‍यांच्या प्रतिनियुक्तीने नियुक्त्या