Maharashtra Politics | ‘राज ठाकरे आमच्यासोबत आले तर…’, शिंदे गटाच्या मंत्र्याचं मोठं विधान

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – मनसे प्रमुख राज ठाकरे (MNS Chief Raj Thackeray) यांची भाजप (BJP)-शिंदे गटाबरोबर (Shinde Group) राजकीय जवळीक (Maharashtra Politics) वाढली आहे. त्यामुळे मनसे महायुतीत सहभागी होणार असल्याच्या चर्चा सुरु आहेत. मात्र, मनसेकडून अद्याप कोणतीही घोषणा करण्यात आलेली नाही. दुसरीकडे राज ठाकरेंनी आगामी निवडणुकांच्या (Elections) पार्श्वभूमीवर दारुगोळा साठवून ठेवलेला बरा, ज्यावेळी गरज लागेल तेव्हा हा दारुगोळा बाहेर काढेल, असे वक्तव्य केलं होतं. यावर शिंदे गटाचे मंत्री अब्दुल सत्तार (Abdul Sattar) यांना मनसे महायुतीत (Maharashtra Politics) सहभागी होणार का? असा प्रश्न विचारण्यात आला. त्यावर त्यांनी आपली भूमिका स्पष्ट केली. ते एका वृत्तवाहिनीशी बोलत होते.

अब्दुल सत्तार म्हणाले, मनसेने कोणाबरोबर जायचं हे राज ठाकरे ठरवतील. राज ठाकरे राज्यातील प्रमुख पुढाऱ्यांपैकी एक आहेत. त्यामुळे त्यांचा निर्णय ते घेतील. राज ठाकरे आमच्याबरोबर आले तर त्यांचे स्वागतच आहे. आमच्या सर्वच नेत्यांनी त्यांना आमच्यासोबत येण्याचं आव्हान केलं आहे. मात्र शेवटी निर्णय राज ठाकरेंचा आहे. ते काय निर्णय घेणार हे इतर कोणालाही सांगता येणार नसल्याचे सत्तार यांनी सांगितले. (Maharashtra Politics)

महाविकास आघाडीच्या (Mahavikas Aghadi) महामोर्चा बाबत बोलताना अब्दुल सत्तार म्हणाले,
महामोर्चात कितीही लोक आले तरी सरकार त्याला घाबरत नाही.
कायदा सुव्यवस्था (Law and Order) कोणीही हातात घेऊ नये इतकी दक्षता ठेवावी. शेवटी मोर्चा काढण्याचे काही नियम आणि धोरण आहे. त्यांनी त्याचे पालन करुन मोर्चा काढावा असा सल्ला सत्तार यांनी दिला. तसेच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांनी तसं स्पष्ट सांगितलं आहे की, आम्ही कोणालाही अडवलेलं नाही, असंही सत्तार सांगायला विसरले नाहीत.

Web Title :- Maharashtra Politics | minister from eknath shinde faction comment on mns raj thackeray

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Manoj Prabhakar | मनोज प्रभाकर यांचा नेपाळ क्रिकेट संघाच्या प्रशिक्षकपदाचा राजीनामा

MP Sanjay Raut | भाजपाच्या काही लोकांचे मेंदू किड्या-मुंग्यांचे, संजय राऊतांचे चित्रा वाघ यांच्या टीकेला प्रत्युत्तर