Maharashtra Politics | ‘पंतप्रधान होणार मज्जा आहे बाबा एका…’, संजय राऊतांच्या ‘त्या’ वक्तव्यावरुन मनसे नेत्याचा खोचक टोला

Maharashtra Politics | mns leaders sandeep deshpandes criticized tweet on sanjay raut statement uddhav thackeray be the face of pm post in 2024 big statement
file photo

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – Maharashtra Politics | आगामी लोकसभा निवडणुकीत (Lok Sabha Election-2024) भाजपचा (BJP) पराभव करण्यासाठी विरोधी पक्षांनी एकत्र यावं, असं आवाहन उद्धव ठाकरेंनी (Uddhav Thackeray) केलं आहे. ठाकरेंच्या या आवाहनानंतर 2024 च्या लोकसभा निवडणुकीत (Maharashtra Politics) पंतप्रधानपदाचा मुख्य चेहरा कोण असेल? याबाबत राजकीय वर्तुळात चर्चा रंगू लागली. याच दरम्यान संजय राऊतांनी (MP Sanjay Raut) पंतप्रधान पदासाठी उद्धव ठाकरे उत्तम चेहरा असल्याचे विधान केले. त्यांच्या विधानावर मनसे नेते संदीप देशपांडे (MNS Leader Sandeep Deshpande) यांनी ट्विट करुन खोचक टोला लगावला आहे.

मनसे नेते संदीप देशपांडे यांनी यासंबंधीचं ट्विट केलं असून ते ट्विट सध्या व्हायरल होत आहे. देशपांडे यांनी उद्धव ठाकरे यांचे नाव न घाता हे ट्विट केलं आहे. भावी पंतप्रधानांना शुभेच्छा. भंकस वाटली असेल तर माफ करा “पण बुरा ना मानो होली (Holi) है “आता तुमच्याशी हिंदीतच बोललं पाहिजे तुम्ही आता पंतप्रधान होणार मज्जा आहे बाबा एका माणसाची, अशा खोचक शब्दात संदीप देशपांडे यांनी ट्विट केलं आहे.

संजय राऊत एक कारकून

संजय राऊतांच्या विधानावर (Maharashtra Politics) शिंदे गटाचे आमदार संजय शिरसाट
(Shinde Group MLA Sanjay Shirsat) यांनी टीकास्त्र सोडलं आहे.
संजय राऊत हे रोज काही ना काही नवीन विधान करत असतात. हा त्यांचा छंद आहे.
उद्धव ठाकरेंची उमेदवारी जाहीर करणारे संजय राऊत कोण आहेत? मुळात संजय राऊत हा एक कारकून आहे.
तो काय उद्धव ठाकरेंची उमेदवारी जाहीर करेल.
याबाबत उद्धव ठाकरे किंवा महाविकास आघाडीतील जे महत्त्वाचे नेते आहेत, ते ठरवतील.
मला पूर्ण विश्वास आहे की संजय राऊतांच्या डोक्यावर परिणाम झाला आहे.
त्यामुळेच तो नको ती बडबड करतो, असे शिरसाट म्हणाले. ते एका वृत्तवाहिनीशी बोलत होते.

Web Title :-Maharashtra Politics | mns leaders sandeep deshpandes criticized tweet on sanjay raut statement uddhav thackeray be the face of pm post in 2024 big statement

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

MP Sanjay Raut | जर मर्द आहात तर समोर येऊन आमच्याशी लढा, संजय राऊतांचे शिंदे गटाला थेट आव्हान

Chhatrapati Sambhajinagar Crime News | लहान मुलांच्या भांडणामध्ये मामाला गमवावा लागला जीव; छत्रपती संभाजीनगरमधील घटना

Pune Crime News | खळबळजनक ! पुण्यातील राजकीय नेत्याच्या मुलाला गोळ्या घालण्याची धमकी; मागितली 30 लाखांची खंडणी

Total
0
Shares
Related Posts
Satish Wagh Murder Case | Satish Wagh was killed by paying a supari of 5 lakhs; Out of the five accused, 3 accused were detained by the police; Neighbor committed act due to personal dispute (Video)

Satish Wagh Murder Case | सतीश वाघ यांची हत्या 5 लाखांची सुपारी देऊन; पाच आरोपींपैकी 3 आरोपींना पोलिसांनी घेतले ताब्यात; शेजारी राहणार्‍याने वैयक्तिक वादातून केले कृत्य (Video)