Maharashtra Politics | 40 आमदार पैशांचा पाऊस पाडतायेत, कुठून आले कोट्यवधी रूपये, आमचे बारीक लक्ष; अजित पवारांचा इशारा

कोल्हापूर : Maharashtra Politics | आम्ही तुमच्यावर बारकाईने लक्ष ठेवून आहोत. 40 आमदार (CM Eknath Shinde Group MLA) पैशाचा पाऊस पाडत आहेत. कोल्हापुरात गद्दार लोकं निघाली आहेत. कोल्हापुरात (Kolhapur News) त्यांना त्यांची जागा दाखवून देऊ, असे अजित पवार (Ajit Pawar) यांनी म्हटले. ते कोल्हापुरात पत्रकारांशी बोलत होते. शिंदे गटाचा दसरा मेळावा बीकेसीवर पार पडला. या मेळाव्यासाठी अवाढव्य खर्च करण्यात आल्याची चर्चा सध्या जोरात सुरू आहे. तसेच दसरा मेळाव्यातील भाषणांवरूनही राजकीय टीका-टिपण्णी सुरू आहे. (Maharashtra Politics)

आज याच मुद्द्यावर अजित पवार म्हणाले की, आम्ही तुमच्यावर बारकाईने लक्ष ठेवून आहोत. 40 आमदार पैशाचा पाऊस पाडत आहेत. कोल्हापुरात गद्दार लोकं निघाली आहे. कोल्हापुरात त्यांना त्यांची जागा दाखवून देऊ. अजित पवार पुढे म्हणाले की, ज्या ज्यावेळी शिवसेना फुटली. त्या त्यावेळी निवडणुकीत आमदार पडलेत, हा इतिहास आहे. नारायण राणे (Narayan Rane) तर पोटनिवडणुकीतही पडले, असा टोलाही अजित पवार यांनी यावेळी लगावला. (Maharashtra Politics)

अजित पवार म्हणाले की, एकनाथ शिंदे म्हणत होते की, लोक स्वतःहून आले. मग भाषणावेळी उठून का जाते होते.
सभेला कोट्यवधींचा खर्च केला. हा पैसा कुठून आला? शिंदेसाहेब हा महाराष्ट्र आहे, असे इथे चालणार नाही.
मुख्यमंत्री शिंदे यांच्या भाषणाला लोकांमधून समोरून प्रतिसाद मिळत नव्हता.
मात्र, उद्धव ठाकरे यांच्या भाषणाला समोरून प्रतिसाद मिळत होता, असे पवार म्हणाले.

दरम्यान, शिंदे गटाच्या बीकेसीवरील (BKC Ground, Mumbai) दसरा मेळाव्यासाठी राज्यभरातून लोकांना
आणण्यासाठी एसटी बसेस आणि खासगी गाड्या, तसेच मेळाव्याचे प्रमोशन, जाहिराती,
लाखो लोकांची खाण्याची सोय आदींवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी कोट्यवधी रुपये खर्च केले.
नोंदणी नसलेल्या एका पक्षाकडे इतकी रक्कम कशी आली? त्यांच्या वतीने कोणी खर्च उचलला?
त्यांच्या पैशाचा स्रोताबाबत मनी लाँड्रिंग अ‍ॅक्ट व आयकर कायद्याच्या तरतुदी अंतर्गत चौकशी करण्याची मागणी
करणारी जनहित याचिका उच्च न्यायालयात दाखल करण्यात आली आहे.
यामुळे एकनाथ शिंदे यांचा दसरा मेळावा वादात सापडण्याची चिन्हे आहेत.

Web Title :- Maharashtra Politics | ncp ajit pawar reaction and warn eknath shinde group spending crore of rupees on dasara melava at bkc ground

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा