Maharashtra Politics | ‘भविष्यात वेगळं काहीतरी… ‘, एकनाथ शिंदे-शरद पवार भेटीवर राष्ट्रवादीच्या आमदाराचं सूचक विधान; राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – राज्यात शिंदे-फडणवीस सरकार (Shinde-Fadnavis Government) अस्तित्वात आल्यापासून राजकीय समीकरणं (Maharashtra Politics) बदलल्याचं पाहायला मिळत आहे. एकीकडे 16 आमदारांच्या अपात्रतेच्या (MLA Disqualification) मुद्यावरुन सरकार कोसळण्याची शक्यता वर्तवली जात आहे. तर दुसरीकडे काँग्रेसचे 22 आमदार सरकारमध्ये जाण्याच्या तयारीत असल्याचा दावा ठाकरे गटाकडून (Thackeray Group) केला जात आहे. याच पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांनी राष्ट्रवादीचे प्रमुख शरद पवार (NCP Chief Sharad Pawar) यांची मुंबईच्या ब्रीच कँडी रुग्णालयात (Breach Candy Hospital) जाऊन भेट घेतली. या अनपेक्षित भेटीमुळे राजकीय चर्चांना (Maharashtra Politics) उधाण आले आहे. त्यातच राष्ट्रवादीचे आमदार अमोल मिटकरी (MLA Amol Mitkari) यांनी केलेल्या एका विधानामुळे तेलच ओतलं गेलं आहे.

मुख्यमंत्र्यांनी दिली शरद पवारांच्या प्रकृतीची माहिती

शरद पवार सध्या प्रकृती अस्वास्थ्यामुळे मुंबईच्या ब्रीच कँडी रुग्णालयात उपचार घेत आहेत. काल (शुक्रवारी) रात्री मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी रुग्णालयात जाऊन शरद पवार यांची भेट घेतली. प्रकृतीची विचारपूस करण्यासाठी ही भेट घेतल्याचं सांगितलं जात असलं तरी यातून वेगवेगळ्या शक्यता वर्तवल्या (Maharashtra Politics) जात आहेत. या भेटीनतंर एकनाथ शिंदे यांनी पवार यांच्या प्रकृतीची माहिती दिली. शरद पवार यांची प्रकृती चांगली आहे. त्यांनी माझ्याशी संवाद साधला. उद्या ते शिर्डीतील राष्ट्रवादीच्या शिबिराला जाणार आहेत. त्यानंतर पुन्हा रुग्णालयात येऊन काही टेस्ट करतील. नंतर त्यांना डिस्चार्ज मिळेल असं त्यांनीच मला सांगितलं, असे एकानाथ शिंदे यांनी सांगितले.

भविष्यात वेगळं काहीतरी…

शिंदे-पवार भेटीवर वेगवेगळे राजकीय अर्थ काढले जात असताना अमोल मिटकरी यांनी दिलेली प्रतिक्रिया त्यात भर घालणारी ठरत आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे काल ब्रीच कँडी रुग्णालयात शरद पवारांना भेटायला गेले.
तिथून आल्यानंतर त्यांनी स्वत: सांगितलं की शरद पवारांची प्रकृती चांगली आहे.
ही माहिती दस्तुरखुद्द एनकाथ शिंदे यांनीच दिली. कालची भेट भविष्यात वेगळं काहीतरी देऊन जाईल,
याबाबत कुणाच्या मनात शंका असण्याचं कारण नाही, असं मिटकरी यांनी सांगितलं.

Web Title :-  Maharashtra Politics | ncp amol mitkari on eknath shinde sharad pawar breach candy hospital visit

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Nawab Malik | नवाब मलिकांना धक्का, ईडीला मिळाली वांद्रे, कुर्ला आणि उस्मानाबाद येथील संपत्ती जप्त करण्याची परवानगी

Gulabrao Patil | ‘… तर राष्ट्रवादी भाजपसोबत गेली असती’, गुलाबराव पाटील यांचा खळबळजनक गौप्यस्फोट

MS Dhoni | IPS अधिकाऱ्याच्या विरोधात महेंद्रसिंग धोनीची याचिका, काय आहे संपूर्ण प्रकरण