Maharashtra Politics | एकनाथ खडसेंनी सांगितले गणित, मविआ सरकारमध्ये राष्ट्रवादीचा मुख्यमंत्री झाला असता, पण…

जळगाव : पोलीसनामा ऑनलाइन – Maharashtra Politics | अंधेरी पूर्व पोटनिवडणुकीसाठी (Andheri East By-Election) शिवसेनेला (Shivsena) काँग्रेस (Congress) आणि राष्ट्रवादी काँग्रेसने (NCP) पाठिंबा दिला असून आता भारतीय कम्युनिस्ट पक्षानेही (Communist Party of India) शिवसेनेला पाठिंबा दिला आहे. शिंदे गट (Shinde group), भाजपकडूनही (BJP) निवडणुकीसाठी जोरदार मोर्चेबांधणी सुरू आहे. अशाप्रकारे राजकीय वातावरण तापलेले असताना राष्ट्रवादीचे नेते एकनाथ खडसे (Eknath Khadse) यांनी जळगावमध्ये केलेल्या एका वक्तव्याने राजकीय वर्तुळात (Maharashtra Politics) आश्चर्य व्यक्त होत आहे.

 

एकनाथ खडसे यांनी कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करताना म्हटले की, महाविकास आघाडीचे सरकार (Maha Vikas Aghadi Government) सत्तेत यायच्यावेळी साधारण दोन-तीन आमदार आपल्याकडे अधिक असते, तर राष्ट्रवादीचा मुख्यमंत्री (CM) झाला असता. महाविकास आघाडी असेल तरीही आपला पक्ष मजबूत केला पाहिजे. संघटन वाढवले पाहिजे. जनसंपर्क वाढवला पाहिजे. आपले जास्तीत जास्त उमेदवार कसे निवडून येतील तिथे लक्ष दिले पाहिजे. राष्ट्रवादी हा पहिल्या क्रमांकाचा पक्ष करण्यासाठी प्रयत्न करा. (Maharashtra Politics)

ते पुढे म्हणाले, आपला मित्र पक्ष मजबूत असला तरी आपणही मजबूत असू शकतो. महाविकास आघाडी पक्षातील घटक हा मजबूत असला पाहिजे. तीन पक्ष मिळून हे सरकार येऊ शकते हे शरद पवारांनी (Sharad Pawar) करून दाखवले होते. त्यामुळे आपला पक्ष मजबूत करण्यावर भर द्यावा. शिंदे सरकार (Shinde Government) येईल असे वाटले नव्हते. आपलेही तीन पक्षाचे सरकार येईल, असेही वाटले नव्हते. मात्र चमत्कार करणारे महापुरुष शरद पवार आपल्यासोबत आहेत. त्यामुळे पुन्हा एकदा आपले सरकार राज्यामध्ये येणार, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

 

कार्यकर्त्यांना आवाहन करताना खडसे म्हणाले, महाराष्ट्रात महाविकास आघाडीने एकत्र निवडणुका लढवल्या.
तीन पक्ष मिळून एकत्र लढावे लागेल.
घोडा मैदान जवळ आले आहे. त्यामुळे तयारीला लागा.

 

Web Title :-  Maharashtra Politics | ncp eknath khadse said if we have more mla than
ncp would have become the chief minister in maha vikas aghadi govt

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा