Maharashtra Politics | ‘ज्यांनी खोके घेतले आहेत, त्यांनी उघडपणे सांगावे…, मला पण उद्धव ठाकरेंनी एक खोका दिला, पण त्यात…’ – अमोल मिटकरी

मुंबई : पोलिसनामा ऑनलाईन – Maharashtra Politics | शिवसेनाप्रमुख उद्धव ठाकरेंना (Shivsena Chief Uddhav Thackeray) भेटायला गेलेल्या अमोल मिटकरींनी (Amol Mitkari) एकनाथ शिंदे गट (Eknath Shinde Group) आणि भाजपची (BJP) सडकून टीका केली. मिटकरी म्हणाले, मला पण उद्धव ठाकरेंनी एक खोका दिला, पण त्यात चॉकलेट होतं, असे म्हणत त्यांनी एकनाथ गटातील नेत्यावर होणाऱ्या ५० खोक्यांच्या टीकेची आठवण करून देऊन, मिश्किल टिपणी केली. (Maharashtra Politics)

अमोल मिटकरी सहकुटुंब मातोश्रीवर उद्धव ठाकरे आणि त्यांच्या घरातल्यांना भेटायला आले होते. त्यावेळी ते पत्रकारांशी बोलत होते. तेव्हा त्यांनी राज्यात आठवडाभरात घडलेल्या बऱ्याच घटनांवर त्यांची प्रतिक्रिया नोंदवली. शिवाय, त्यांना फक्त चॉकलेट असलेले फक्त एक खोके मिळून सुद्धा ते आनंदी आहेत, असे दर्शवून त्यांनी स्वतःच्या प्रामाणिकपणाची शाश्वती दिली. ज्यांनी खोके घेतले आहेत, त्यांनी उघडपणे सांगावे, असेही मिटकरी म्हणाले. (Maharashtra Politics)

त्याशिवाय भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळेंच्या जादूटोण्याच्या वक्तव्याची त्यांनी टीका केली.
शरद पवारांनी (Sharad Pawar) केलेल्या जादूटोण्यामुळे उद्धव ठाकरे त्यांच्या तावडीतून सुटत नाहीयेत, अशा प्रकारचे वक्तव्य चंद्रशेखर बावनकुळे (Chandrashekhar Bawankule) यांनी केले होते. त्याला उत्तर देत मिटकरी म्हणाले, ‘भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी केलेले वक्तव्य हे अंधश्रद्धेला खतपाणी घालणारे असून सरकारने याची तात्काळ दखल घेऊन बावनकुळे यांच्यावर कायदेशीर कारवाई करावी. तसेच, डॉक्टर नरेंद्र दाभोळकरांचा हा महाराष्ट्र आहे हे सिद्ध करावे.’

Web Title :- Maharashtra Politics | ncp leader amol mitkari taunts shinde group after meet shiv sena uddhav thackeray at matoshree

Advt.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Sanjay Raut | ‘राहुल गांधी आणि आदित्य ठाकरे यांच्यात देशाचे नेतृत्व करण्याची क्षमता’

Chandrakant Patil | ‘एखादा चित्रपट तुम्हाला आवडला नाही तर चित्रपटगृहाबाहेर गळ्यात पाट्या लावून उभे राहा’ – चंद्रकांत पाटील

Aam Aadmi Party | ठाणे मनपा निवडणूकीत ‘आप’ची एन्ट्री, सत्ताधारी आणि विरोधकांची वाढली डोकेदुखी