Maharashtra Politics | रत्नागिरी जिल्ह्यातील ‘या’ बड्या नेत्याचा होणार ठाकरे गटात प्रवेश; रामदास कदम यांच्या वाढणार अडचणी?

रत्नागिरी : पोलीसनामा ऑनलाईन – Maharashtra Politics | रत्नागिरी जिल्ह्यात लवकरच मोठी राजकीय उलथापालथ होणार असल्याचे बोलले जात आहे. माजी आमदार संजय कदम (Sanjay Kadam) हे लवकरच ठाकरे गटात प्रवेश करणार असल्याचे बोलले जात आहे. संजय कदम ठाकरे गटात आल्यास माजी मंत्री रामदास कदम (Ramdas Kadam) यांच्या समोर अडचणींमध्ये वाढ होणार असल्याचे देखील बोलले जात आहे. ठाकरे गटाकडून रामदास कदम यांना कोंडीत पकडण्यासाठी रणनिती आखण्यात येत आहे, याच पार्श्वभूमीवर संजय कदम हे ठाकरे गटात प्रवेश करणार असल्याची चर्चा आहे. ते पुढील काही दिवसांमध्ये ठाकरे गटात प्रवेश करणार असून त्यांच्या प्रवेशासाठी उद्धव ठाकरे देखील उपस्थित राहणार आहेत. असे बोलले जात आहे. (Maharashtra Politics)

 

सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी संजय कदम यांच्या प्रवेशावर सहमती दर्शवली आहे. त्यामुळे आता संजय कदम यांच्या घरवापसीच्या चर्चेला उधान आले आहे. ते राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातून शिवसेनेत प्रवेश करणार आहेत. याअगोदर रत्नागिरी जिल्ह्यातील चारपैकी दोन आमदार शिंदे गटात दाखल झाल्यामुळे या मतदारसंघातील ठाकरे गटाची ताकद काहीशी कमी झाली होती. त्यातच आता संजय कदम हे पुन्हा एकदा ठाकरे गटात सामील होणार असल्याच्या चर्चेने या मतदारसंघात परत एकदा मोठी चुरस निर्माण होणार आहे. (Maharashtra Politics)

दापोली (Dapoli legislative Assembly Constituency) मतदारसंघाचे नेतृत्व करत असलेले
आमदार योगेश कदम यांच्यापुढील अडचणींमध्ये वाढ होणार असल्याचे देखील रत्नागिरीच्या राजकीय वर्तुळात बोलले जात आहे.
दापोली मतदारसंघात माजी मंत्री रामदास कदम यांना घेरण्याची रणनिती ठाकरे गटाकडून आखण्यात येत आहे.
संजय कदम हे रामदास कदम यांचे कट्टर प्रतिस्पर्धी म्हणून ओळखले जातात.
त्यामुळे येत्या काळात ते रामदास कदम आणि दापोलीचे विद्यमान आमदार आणि रामदास कदम यांचे पुत्र योगेश कदम यांना चांगलेच आव्हान या मतदारसंघात उभे करू शकतात.

 

 

 

Web Title :- Maharashtra Politics | ncp leader sanjay kadam will enter the thackeray group

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा