
ठाणे : पोलीसनामा ऑनलाइन – Maharashtra Politics News | ठाण्यात ठाकरे गटाच्या (Thackeray Group) महिला कार्यकर्त्या रोशनी शिंदे (Roshni Shinde Beating Case) यांना शिंदे गटाच्या (Shinde Group) महिला कार्यकर्त्यांकडून मारहाण करण्यात आली. यावरुन राज्यातील आणि ठाण्यातील राजकीय वातावरण (Maharashtra Politics News) चांगलेच तापले आहे. अशातच शिवसेना (Shivsena) शिंदे गटाच्या नेत्या आणि माजी उपमहापौर मीनाक्षी शिंदे (Meenakshi Shinde) यांनी रोशनी शिंदे यांना पोलीस संरक्षण (Police Protection) देण्याची मागणी केली. ठाकरे गटावर आरोप करताना राजकारणासाठी रोशनीचा नाहक बळी जाऊ नये, असे मिनाक्षी शिंदे यांनी म्हटले आहे. त्या एका वृत्तवाहिनीशी बोलत होत्या.
यावेळी बोलताना मिनाक्षी शिंदे यांनी उद्धव ठाकरेंवर (Uddhav Thackeray) निशाणा साधताना आनंद दिघे (Anand Dighe) यांच्या मृत्यूबाबत (Death) खळबळजनक दावा केला आहे. आनंद दिघे यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरु होते. तेव्हा उद्धव ठाकरे रुग्णालयात येऊन गेल्यानंतर अर्ध्या तासात आनंद दिघे यांना मृत घोषित करण्यात आले. त्यामुळे आजपर्यंत ठाणेकरांच्या मनात संभ्रमाचे वातावरण आहे. राजकारणाची पातळी घसरत चालली आहे. त्यात रोशनी शिंदेंचा नाहक बळी जाऊ नये, असे मिनाक्षी शिंदे यांनी म्हटले.
रोशनी शिंदेच्या प्रकृतीबाबत माहिती देताना मिनाक्षी शिंदे म्हणाल्या, रोशनी यांची प्रकृती ठीक असल्याचे दोन डॉक्टरांनी सांगितले आहे. परंतु तरीही रोशनीला सातत्याने खासगी रुग्णालयात दाखल करण्याचा प्रयत्न केला जात आहे. ती गंभीर असल्याचे भासवले जात आहे.
गर्भवती (Pregnant) नसताना ती गर्भवती असल्याचे सांगितले जात आहे. त्यांना बोलता येत नसल्याचे सांगण्यात येत आहे.
हे का चालले आहे, या मागचे गूढ अद्याप उलगडले नाही.
एकीकडे आजारपण दाखवले जात असताना उद्या एखाद्या डॉक्टरांनी तिला इंजेक्शन देऊन मारले तर आम्हाला कळणार देखील नाही.म्हणून आम्ही पोलीस संरक्षणाची मागणी करत असल्याचे मिनाक्षी शिंदे यांनी सांगितले.
Web Title :- Maharashtra Politics News | after meet uddhav thackeray anand dighe death say s
hinde group leader minakshi shinde
Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update
Reserve Bank of India | तुमचे कर्ज महागणार की स्वस्त होणार? आरबीआयची मोठी घोषणा
Pune Crime News | मुंढवा : भांडणे सोडविण्यास जाणे पडले महागात; तरुणाला मारहाण करुन केले जबर जखमी