Maharashtra Politics News | ईडीच्या रुपात आजही औरंगजेब जिवंत आहे, राष्ट्रवादीच्या आमदाराचा थेट ईडीवर निशाणा

सांगली : पोलीसनामा ऑनलाइन – Maharashtra Politics News | ईडीकडून अनेक राजकीय नेत्यांना समन्स पाठवून चौकशीला बोलवले जात आहे. राष्ट्रवादीचे (NCP) प्रदेश अध्यक्ष जयंत पाटील (Jayant Patil ED Inquiry) यांची ईडीकडून नुकतीच चौकशी करण्यात आली. यावरुन राष्ट्रवादीच्या नेत्यांकडून (Maharashtra Politics News) संताप व्यक्त केला जात आहे. औरंगजेब जरी मेला असेल तरी ईडीच्या रुपाने आजही जिवंत आहे, असे म्हणत राष्ट्रवादीचे आमदार अमोल मिटकरी (MLA Amol Mitkari) यांनी थेट ईडीवर टीका केली आहे.

 

वाळवा तालुक्यातील बागणी येथे राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जंयत पाटील यांच्या माध्यमातून ग्रामपंचायत इमारतीवर उभारलेल्या छत्रपती संभाजी महाराज (Chhatrapati Sambhaji Maharaj) यांच्या तैलचित्राच्या अनावरण सोहळ्यात आमदार मिटकरी (Maharashtra Politics News) बोलत होते. त्यावेळी जयंत पाटील हे देखील उपस्थित होते. राष्ट्रवादीच्या एकामागून एक नेत्याला येत असलेल्या ईडीच्या नोटीसीबद्दल आणि होत असलेल्या चौकशीबद्दल मिटकरी यांनी खदखद व्यक्त करुन ईडीवर निशाणा साधला.

 

अमोल मिटकरी म्हणाले, औरंगजेबाची (Aurangzeb) कितीही आक्रमणे आली तरी कधीही छत्रपती संभाजी महाराज डगमगले नाहीत. पोर्तुगिजांची, डचांची, इंग्रजांची, मोघलांची आक्रमणे झाली, पण संभाजी महाराज कधीच डगमगले नाहीत. हेच रक्त आज तुमच्या-आमच्यामध्ये आहे. औरंगजेब जरी मेला असेल तरी ईडीच्या रुपाने तो आजही जिवंत आहे.

त्यामुळे ईडीची कितीही आक्रमणे झाली तरी त्याला किंचितही शरण न जाणारायोद्धा म्हणून शरद पवार (Sharad Pawar)
आणि जयंत पाटील यांच्याकडे पाहतो. जे शरण गेलेत ते आता काही दिवसांनी शपथ घेतील.
पण जे शरण गेले नाहीत त्यांना काही दिवस त्रास होत राहतो, असं मिटकरी म्हणाले.

 

 

Web Title :  Maharashtra Politics News | aurangzeb is still alive as ed says amol mitkari

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा