Maharashtra Politics News | ‘औरंगजेबचा पुनर्जन्म म्हणजेच शरद पवार’, भाजप नेत्याचा शरद पवारांवर ‘प्रहार’

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – Maharashtra Politics News | राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार (NCP Chief Sharad Pawar) यांनी केलेल्या एका विधानावरुन राजकीय वर्तुळात मोठी चर्चा सुरु असल्याचे पाहायला मिळत आहे. मुस्लीम (Muslim) आणि ख्रिश्चन समाजाविषयी (Christian community) शरद पवारांनी हे विधान केले आहे. (Maharashtra Politics News) यावरुन सत्ताधाऱ्यांकडून शरद पवारांवर निशाणा साधला जात आहे. देशात मुस्लीम आणि ख्रिश्चन समाजाबाबत चिंता वाटावी असं चित्र आहे, असं शरद पवार यांनी एका कार्यक्रमात बोलताना म्हणाले होते. यावरुन भाजप (BJP) नेते निलेश राणे (Nilesh Rane) यांनी शरद पवारांची तुलना थेट औरंगजेबाशी केली आहे. राणे यांनी केलेलं ट्विट सध्या सोशल मीडियात व्हायरल होत आहे.

काय म्हणाले शरद पवार?

एका कार्यक्रमात बोलताना शरद पवार यांनी काही चर्चावर झालेल्या हल्ल्यांचा संदर्भ देत मोठ विधान केलं. या देशात मुस्लीम आणि ख्रिश्चन या दोन समाजांच्या बाबत चिंता वाटावी असं चित्र आहे. ख्रिश्चन समाजाच्या चर्चवर हल्ले होत आहेत. मुस्लीम समाजात चार-देन लोकांकडून चुका होऊ शकतात. तशा हिंदूंकडूनही चुका होतात. काही लोक जाणीवपूर्वक भेदाभेद कसा होईल, द्वेषभावना अशी वाढेल याची काळजी घेतात. हे या देशासमोरचं एक मोठं आव्हान मला दिसत असल्याचे शरद पवार म्हणाले होते. (Maharashtra Politics News)

निलेश राणेंचे खोचक ट्विट

Advt.

शरद पवार यांनी केलेले विधान आणि त्यावरचं स्पष्टीकरण आल्यानंतर भाजपचे नेते निलेश राणे यांनी खोचक
ट्वीट केलं आहे. एका वृत्तवाहिनीचा स्क्रीनशॉट शेअर करुन त्यावर निलेश राणे यांनी शरद पवारांना लक्ष्य केलं आहे.
निवडणूक जवळ आली की पवार साहेब मुस्लीम समाजासाठी चिंताग्रस्त होतात.
कधीकधी वाटतं, औरंगजेबाचा (Aurangzeb) पुनर्जन्म म्हणजेच शरद पवार, असं ट्विट राणे यांनी केलं आहे.

Web Title : Maharashtra Politics News | ‘Aurangzeb’s reincarnation means Sharad Pawar’, BJP leader’s ‘hit’ on Sharad Pawar

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Maharashtra Weather Update | मॉन्सून पुन्हा लांबणीवर; महाराष्ट्रात 16 जूनपर्यंत पावसाची शक्यता

Pune Gold Rate Today | सोन्या-चांदीचे दर पुन्हा वधारले; जाणून घ्या आजचा भाव

Pune Crime News | पुणे क्राईम न्यूज : लोणी काळभोर पोलिस स्टेशन – अपघातामुळे बनावट नंबर प्लेट लावून फिरणारा कारचालक सापडला