Maharashtra Politics News | ‘आव्हाड, छप्पराने आभाळ व्हायचा उद्धटपणा करु नये’, ठाण्यात बॅनरबाजी

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – Maharashtra Politics News | राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाड (NCP MLA Jitendra Awhad) यांनी केलेल्या विधानानंतर शिवसेनेचे नेते नरेश म्हस्के (Shiv Sena Leader Naresh Mhaske) यांनी टीका केली होती. धर्मवीर आनंद दिघे (Dharmaveer Anand Dighe) यांना जामीन मिळवून देण्यासाठी शरद पवार (Sharad Pawar) यांनी मदत केली होती असं वक्तव्य आव्हाड यांनी केलं होतं. यावरुन आता ठाण्यात बॅनर वॉर रंगल्याचे पाहायला मिळत आहे. (Maharashtra Politics News) कळवा नाका परिसरात आनंद दिघे यांच्या फोटोसह काही मजकूर या बॅनरवर लिहिण्यात आला असून उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्या शिवसेनेवर निशाणा साधला आहे.

शिवसेनेने लावलेल्या बॅनरवर म्हटलं की, सुरक्षा कमी करुन धर्मवीर आनंद दिघे साहेब यांच्या सारखा दरारा असणाऱ्या व्यक्तिमत्वाला भीती दाखवायचा निष्कळ प्रयत्न करणारे पळपुटे तुम्ही… साहेबांना जामीन (Bail) देणारे तुम्ही कोण? धर्मवीर आनंद दिघे साहेब यांना मदत तीही तुमच्याकडून? मागितली असं बरळता? थुंकी विकास आघाडीचे थेंब आहात तुम्ही. आव्हाड. छप्पराने आभाळ बनायचा उद्धटपणा करु नये. (Maharashtra Politics News)

आव्हाड-म्हस्के यांच्या वादावर अद्याप ठाकरे गटाकडून (Thackeray Group) कोणतीच प्रतिक्रिया आलेली नाही. त्यातच आता बॅनरवरून उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेवर (Shiv Sena Uddhav Balasaheb Thackeray) निशाणा साधला आहे. जितेंद्र आव्हाड यांनी जे वक्तव्य केलं आहे ते खरं आहे का? असा प्रश्न बॅनरच्या माध्यमातून विचारला जात आहे.

Web Title : Maharashtra Politics News | Awad, the roof should not be arrogant, banner war in Thane

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Pune Gold Rate Today | काय आहेत आजचे पुण्यातील सोन्या-चांदीचे दर? जाणून घ्या

Petrol Diesel Price Today | सर्वसामान्यांसाठी दिलासा! पेट्रोल-डिझेलचे दर कमी होण्याची शक्यता; जाणून घ्या आजचा दर

Maharashtra Monsoon Update | पुढील 24 तासांत वादळी वाऱ्यांसह पावसाची शक्यता; मुंबई, ठाणेसह कोकणातही बरसणार सरी