Maharashtra Politics News | भगवान गडावर राजकीय वाद, पंकजा मुंडे आणि नामदेव शास्त्री यांच्यात खडाजंगी

पाथर्डी : पोलीसनामा ऑनलाइन – Maharashtra Politics News | महाराष्ट्रातील हजारो भक्तांचे श्रद्धास्थान असलेल्या भगवान गडाच्या (Bhagwan Gad) 89 व्या फिरत्या नारळी सप्ताहाला महंत नामदेव शास्त्री (Mahant Namdev Shastri) यांच्या उपस्थित सुरुवात झाली. पाथर्डी तालुक्यातील भारजवाडी गावात हा कार्यक्रम झाला. यावेळी (Maharashtra Politics News) नामदेव शास्त्री, पंकजा मुंडे (Pankaja Munde), धनंजय मुंडे (Dhananjay Munde) हे उपस्थित होते. यावेळ नामदेव शास्त्री यांनी पंकजा मुंडे आणि धनंजय मुंडे यांना न भांडण्याचा सल्ला दिला.

नामदेव शास्त्री म्हणाले, पंकजा मुंडे यांच्यासोबत माझं वैर नाही, त्यांचे चमचे खराब आहेत. पंकजांनी अहंकार कमी करावा, स्वाभीमान ठेवा, अहंकार सोडा, असा सल्ला त्यांनी दिला. तसेच दोघंही मुंडे घराण्यासाठी आणि समाजासाठी महत्त्वाचे असल्याचे नामदेव शास्त्री यांनी म्हटले.

नामदेव शास्त्री यांनी सल्ला दिल्यानंतर पंकजा मुंडे यांनी उत्तर दिलं.
माझ्या बोलण्याला माझ्या उंचपुऱ्या व्यक्तीमत्वाला आणि लाखोंच्या जनसमुदायात बोलताना मोठा आवाज केला तर
त्याला अहंकार समजू नका अशा शब्दात पंकजा मुंडे यांनी प्रत्युत्तर दिले.
स्त्री बोलली तर तर तो अहंकार आणि एखादा पुरुष कितीही चुकीचा असला आणि तो बोलला तर त्याला वाघ
समजायचं ही तुमची मानसिकता आहे का? असा सवाल पंकजा मुंडे यांनी विचारला.

मागील काही काळापासून नामदेव शास्त्री आणि पंकजा मुंडे यांच्यात वाद झाले आहेत.
सात वर्षानंतर पंकजा मुंडे, धनंजय मुंडे आणि नामदेव शास्त्री पहिल्यांदाच एका व्यासपीठावर आले होते.

Web Title :-  Maharashtra Politics News | bhagwangad pankaja munde namdev shastri and dhananjay munde at same stage

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Chandrashekhar Bawankule | ‘बाळासाहेब ठाकरे यांच्याबद्दलचे चंद्रकांतदादांचे ते विधान चुकीचे’, भाजपने स्पष्टच सांगितलं

Chandrakant Patil | ‘बाळासाहेबांबद्दल माझ्या मनात श्रद्धा, माझ्या वक्तव्याचा विपर्यास केला’, ‘त्या’ विधानावरुन चंद्रकांत पाटलांचे स्पष्टीकरण (व्हिडिओ)

Maharashtra Politics News | ‘बाळासाहेबांचा इतका मोठा अपमान करण्याची हिंमत कुणी केली नव्हती’, संजय राऊतांचा भाजपवर घणाघात; शिंदे गटाला दिलं थेट आव्हान