Maharashtra Politics News | भाजप-शिंदे गटात वादाची ठिणगी? शिंदे गटाच्या खासदाराचा खळबळजनक आरोप; म्हणाले- ‘शिंदे गटाच्या खासदारांना भाजपकडून सापत्न…’

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – Maharashtra Politics News | राज्यात भाजप (BJP) -शिंदे गटाने (Shinde Group) एकत्र येऊन राज्यात सरकार स्थापन केले. त्यानंतर दोन्ही गटांमध्ये सर्व अलबेल असल्याचे दिसत असले तरी दोन्ही पक्षांमध्ये अंतर्गत धुसफूस असल्याचे समोर आले आहे. (Maharashtra Politics News) शिंदे गटाचे खासदार गजानन किर्तीकर (MP Gajanan Kirtikar) यांच्या एका वक्तव्यामुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे. भाजपकडून शिंदे गटाच्या 13 खासदारांना सापत्न वागणूक (Discrimination) मिळत असल्याचे गजानन कीर्तिकर यांनी म्हटले आहे.
गजानन कीर्तीकर म्हणाले, आम्ही 13 खासदार एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांच्यासोबत आलो.
आमचा शिवसेना (Shivsena) पक्ष राष्ट्रीय लोकशाही आघाडीचा (NDA) घटक आहे.
त्यामुळे एनडीएचा घटक पक्ष असल्याप्रमाणेच आमची कामं झाली पाहिजेत. (Maharashtra Politics News) मी हा मुद्दा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबत झालेल्या बैठकीत मांडला. भाजपकडून आम्हाला घटक पक्षाचा दर्जा मिळाला पाहिजे. त्याप्रमाणे आम्हाला वागवले गेले पाहिजे. मात्र, भाजपकडून आमच्या खासदारांना सापत्न वागणूक मिळत असल्याचा गंभीर आरोप कीर्तीकर यांनी केला आहे. ते मुंबईत प्रसारमाध्यमांशी बोलत होते.
आगामी लोकसभा निवडणुकीच्या (Lok Sabha Elections) जागावाटपाबाबत बोलताना कीर्तीकर म्हणाले,
लोकसभेच्या 22 जागा या आमच्याच आहेत, त्यामुळे या जागांवर वेगळा दावा करायचा प्रश्नच येत नाही.
2019 मध्ये शिवसेना-भाजप एकत्र असताना जागावाटप झाले त्यावेळी आम्ही 23 तर भाजपने 26 जागा लढवल्या.
त्यापैकी भाजपच्या 22 तर आमच्या 18 जागांवर खासदार निवडून आले. त्यामुळे आगामी निवडणुकीत हेच सूत्र राहील.
त्यानुसार आमची तयारी झाली असल्याचा दावा कीर्तीकर यांनी केला आहे.
Web Title : Maharashtra Politics News | bjp doing discrimination with shivsena shinde camp mps says gajanan kirtikar in mumbai
Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update
हे देखील वाचा