Maharashtra Politics News | ‘राष्ट्रवादीचे आमदार भाजपात येण्यास तयार, पण…’, भाजपच्या बड्या नेत्याचा खळबळजनक गौप्यस्फोट

नागपूर : पोलीसनामा ऑनलाइन – Maharashtra Politics News | आमच्या संपर्कात तिन्ही पक्षाचे आमदार आहेत, राष्ट्रवादीचे आमदार (NCP MLA) भाजपमध्ये (BJP) येण्यास तयार आहेत. पण आता त्यांना पक्षात आणून फायदा नाही, कारण त्यांचे सदस्यत्व रद्द होईल, असा मोठा गौप्यस्फोट भाजपचे नेते सुधीर मुनगंटीवार (Sudhir Mungantiwar) यांनी केला आहे. तसेच मी कोणाचं नाव घेऊन संशय निर्माण करणार नसल्याचेही त्यांनी म्हटले आहे. मुनगंटीवार यांच्या खळबळजनक दाव्यामुळे राजकीय (Maharashtra Politics News) वर्तुळात चर्चांना उधाण आलं आहे.
आज कर्नाटकात मुख्यमंत्र्यांचा शपथविधी (Karnataka CM Oath Ceremony) होत असून या शपथविधी सोहळ्याला महाराष्ट्रातील महाविकास आघाडीच्या (Maharashtra Politics News) नेत्यांना निमंत्रण दिले आहे. यावरुन सुधीर मुनगंटीवार यांनी महाविकास आघाडीवर (Mahavikas Aghadi) निशाणा साधला आहे. राज्यातील नेते कर्नाटकमध्ये शपथविधीसाठी नाही तर महाराष्ट्राचा भाग मागायला गेले आहेत. याबाबत ते संध्याकाळी पत्रकार परिषद घेतील आणि तसं पत्र देखील आणतील. आमचं सरकार होतं, त्यावेळी तिथे भाजपचं सरकार असल्याची ओरड ते करत होते, असा खोचक टोला त्यांनी लगावला.
यावेळी बोलताना मुनगंटावीर यांनी ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत (MP Sanjay Raut) यांच्यावर निशाणा साधला. संजय राऊत निवडणुका घेण्याबाबत वारंवार बोलत आहेत. त्यांनी आधी वरळी विधानसभेची निवडणूक (Worli Assembly Election) घ्यावी, म्हणजे आपोआपच कळेल पोपट कोणाचा मेला आहे. दुसऱ्याला तत्वज्ञान सांगू नये, अशा शब्दात त्यांनी राऊतांवर टीकास्त्र सोडलं.
दोन हजार रुपयांची नोट बंद (Demonetisation) केल्यानंतर विरोधकांकडून मोदी सरकारवर टीका केली जात आहे.
यावर बोलताना सुधीर मुनगंटीवार म्हणाले, जसं पाणी शुद्ध करतो तसं अर्थव्यवस्था (Economy) शुद्ध
करण्यासाठी नोट बदलणे गरजेचे असतं, असं सांगत त्यांनी विरोधकांच्या टीकेचा समाचार घेतला.
Web Title : Maharashtra Politics News | bjp has claimed that ncp mlas are likely to split
Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update
हे देखील वाचा