Maharashtra Politics News | ‘घरात बसून स्वप्न बघितल्यावर…’, राज ठाकरेंच्या टीकेला भाजपचे प्रत्युत्तर

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – Maharashtra Politics News | कर्नाटक विधानसभेच्या निवडणुकीत (Karnataka Election Result 2023) काँग्रेसने (Congress) भाजपचा (BJP) दारुण पराभव केला. कार्नाटक निकालावर मनसे प्रमुख राज ठाकरे (MNS Chief Raj Thackeray) यांनी हा पराभव भाजपच्या स्वभावाचा आणि वागणुकीचा असल्याची टीका (Maharashtra Politics News) केली होती. राज ठाकरे यांच्या टीकेला भाजपचे आमदार आशिष शेलार (BJP MLA Ashish Shelar) यांनी प्रत्युत्तर दिले आहे.

 

काय म्हणाले राज ठाकरे?

हा पराभव भाजपच्या (BJP) स्वभावाचा आणि वागणुकीचा आहे. आपलं कोण वाकडं करु शकतो अशा विचारात जो असतो त्याचा पराभव आहे, असं मला वाटतं. भारत जोडो यात्रेचा स्पष्ट परिणाम झालेला दिसतो. तुमच्या मालकांनी बातम्या दाबल्या तरीही भारत जोडो यात्रेचा (Bharat Jodo Yatra) प्रभाव दिसतोय. तुम्ही कितीही नाकारलं (Maharashtra Politics News) तरीही या निकालात भारत जोडो यात्रेचा परिणाम झालेला आहे, असे राज ठाकरे म्हणाले होते.

 

आशिष शेलार यांचे प्रत्युत्तर

घरात बसून स्वप्न बघितल्यावर स्वप्नातल्याच प्रतिक्रिया माणूस देऊ शकतो. जर कर्नाटकमध्ये राहुल गांधींच्या (Rahul Gandhi) भारत जोडो यात्रेचा प्रभाव असेल, तर मग जालंधरमध्ये आम आदमी पक्षाचा (Aam Aadmi Party) विजय आणि काँग्रेसचा पराभव का झाला? जालंधरमध्ये राहुल गांधींच्या भारत जोडो यात्रेचा प्रभाव नव्हता का? उत्तर प्रदेशमध्ये झालेल्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणीत भाजपला यश आले. मग त्याठिकाणी भारत जोडो यात्रेचा प्रभाव नव्हता का? यावर राज ठाकरे बोलतील का? असा सवाल उपस्थित करत शेलार यांनी राज ठाकरेंच्या टीकेला प्रत्युत्तर दिले.

तसेच राज ठाकरे हे केवळ स्वत:चं अस्तत्व दाखवण्यासाठी प्रतिक्रिया देत असून त्यांच्या प्रतिक्रियेला आम्ही फार महत्त्व देत नाही, असा टोला आशिष शेलार यांनी लगावला आहे.

 

Web Title :- Maharashtra Politics News | BJP leader ashish-shelar-replied-to-raj-thackeray-over-criticism-of-bjp-after-karnatak-election-result

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Jayant Patil | ‘कायदा व सुव्यवस्था राखणं पोलीस दलाचं काम पण…’; अमोल कोल्हेंच्या ‘त्या’ आरोपांवरुन जयंत पाटलांचा
गृहमंत्र्यावर निशाणा

Vision Cup Under-15 Cricket Tournament | ‘व्हिजन करंडक’ अजिंक्यपद १५ वर्षाखालील क्रिकेट स्पर्धा;
लायन्स् इलेव्हन, लेपर्डस् इलेव्हन संघांचा दुहेरी विजय; लिंक्स् इलेव्हन संघाने गुणांचे खाते उघडले

Karnataka Election Result 2023 | कर्नाटकच्या निकालावर राज ठाकरेंचा भाजपवर निशाणा, म्हणाले –
‘हा पराभव भाजपाच्या…’

Karnataka Election Result 2023 | भाजपचं पार्सल परत पाठवलं म्हणायचं का?, कर्नाटक निकालावरुन
एकनाथ खडसेंची फडणवीसांवर बोचरी टीका

Pune Crime News | पुणे क्राईम न्यूज : लोणी काळभोर पोलिस स्टेशन – हप्ते थकल्याने भररस्त्यात गाडी चोरुन नेण्याचा प्रयत्न