Maharashtra Politics News | ‘राज्याचे स्वघोषित कुटुंबप्रमुख असलेले उद्धव ठाकरे वेळ आली की…’, मोदींवरील टीकेला भाजपचे प्रत्युत्तर

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – Maharashtra Politics News | उद्धव ठाकरे यांनी महाड येथे झालेल्या सभेत बोलताना पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) आणि भाजपवर (BJP) जोरदार टीका केली होती. पंतप्रधान मतदारांना ‘बजरंग बली की जय’ म्हणायला सांगतात. मग तुमचे बळ आणि 56 इंचाची छाती कुठे आहे? असा सवाल उद्धव ठाकरे (Maharashtra Politics News) यांनी विचारला होता. उद्धव ठाकरेंच्या (Uddhav Thackeray) टीकेला भाजपचे नेते तथा प्रवक्ते केशव उपाध्ये (Spokesperson Keshav Upadhye) यांनी ट्विट करत प्रत्युत्तर दिले आहे.

 

केशव उपाध्ये यांनी ट्विटमध्ये म्हटले, राज्याचे स्वघोषित कुटूंबप्रमुख उद्धव ठाकरे वेळ आली की मैदान सोडून घरात बसतात. आज ते पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या ‘जय बजरंग बली’वर प्रश्न उभे करत आहेत. मविआ बरोबर हिंदुत्व (Hindutva) गुंडाळून टाकून देत, खुर्चीच्या मागे जाणाऱ्यांना आता ‘जय भवानी,जय शिवाजी’ म्हणा सांगतात. मात्र स्वःताच हिंदुत्व सोडल त्याबद्दल का बोलत (Maharashtra Politics News) नाहीत, असं उपाध्ये म्हणाले.

काय म्हणाले उद्धव ठाकरे?
महाडच्या सभेत बोलताना उद्धव ठाकरे म्हणाले, आज पंतप्रधान मतदारांना ‘बजरंग बली की जय’ म्हणा सांगतात.
मग तुमचे बळ आणि 56 इंचाची छाती कुठे आहे? त्यामुळे यापुढील प्रत्येक निवडणुकीत ‘जय भवानी जय शिवाजी’ म्हणत भाजपला तडीपार करा,
असे ते म्हणाले होते. तसेच उद्धव ठाकरेंनी हिंदुत्व सोडलं या शिंदे गटाच्या (Shinde Group) टीकेवर भाष्य करताना ते म्हणाले,
उद्धव ठाकरेंनी हिंदुत्व सोडलं म्हणून शिवसेनेतून (Shivsena) बाहेर पडलो, अशी बोंब ठोकली जाते.
मात्र, आमचं हिंदुत्व शेंडी जानव्याचे नाही. अनेकदा बाळासाहेबांनी (Balasaheb Thackeray) सांगितलंय,
मला देवळात घंटा बडवणारा हिंदू नकोय, मला अतिरेकी आणि देशद्रोह्यांना बडवणारा हिंदू पाहिजे, असेही उद्धव ठाकरे म्हणाले होते.

 

Web Title :- Maharashtra Politics News | bjp leader keshav upadhye replied shivsena uddhav thackeray after criticism on pm narendra modi jay bajrangbali statement

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

Sasubai Jorat Marathi Movie | मल्टीस्टारर धमाल कॉमेडी “सासूबाई जोरात’२६ मे पासून संपूर्ण महाराष्ट्रात

Pune Crime News | पुणे क्राईम न्यूज : सहकारनगर पोलिस स्टेशन – वर्षभरापासुन फरारी असलेल्या आरोपीला अटक

Railway Summer Special Trains For Konkan | Pune : या उन्हाळी सुट्टीत करा कोकण वारी; मध्य रेल्वच्या कोकणासाठी विशेष गाड्या