
Maharashtra Politics News | भाजपची उद्धव ठाकरेंवर टीका; म्हणाले, – “घरात बसून टोमणे कोणालाही मारता येतात, पण…”
मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – Maharashtra Politics News | शिवसेना – Shivsena (ठाकरे गट – Thackeray Group) पक्षप्रमुख आणि माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांची ‘आवाज कुणाचा’ या शिवसेनेच्या पॉडकास्टमध्ये खासदार संजय राऊत (MP Sanjay Raut) यांनी मुलाखत घेतली. या मुलाखतीत उद्धव ठाकरेंनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांच्यासह भारतीय जनता पार्टीवर (BJP) निशाणा साधला आहे. या मुलाखतीवरून आता भाजपनेही टीकास्त्र (Maharashtra Politics News) सोडले आहे. घरात बसून टोमणे कोणालाही मारता येतात. हिंमतवान लोक समोरासमोर येऊन चर्चा करतात. अशी टीका भाजपने ठाकरेंवर केली आहे.
”स्वत:च्या नाकर्तेपणाला भावनांची झालर लावणाऱ्या उद्धव ठाकरेंनी मुलाखतीत विक्टिम कार्ड खेळले, अशीही टीका भाजपाने केली आहे. उद्धव ठाकरेंनी नुकतीच स्वत:च्याच पॉडकास्ट चॅनेलला मुलाखत दिली. तेही स्वत:ला विश्वगुरू मानणाऱ्या संजय राऊत यांना. हे म्हणजे माझाच बॉल, माझीच बॅट आणि माझेच मैदान असे आहे. बॉल टाकणारा भिडूही माझाच, म्हणजे विकेट पडण्याचा सवालच नाही. असे व्हिडीओत म्हटले आहे. (Maharashtra Politics News)
पुढे त्या व्हिडीओत म्हटले आहे की, घरात बसून मुख्यमंत्रीपद (Chief Ministership) सांभाळणाऱ्या नव्हे, तर मुख्यमंत्रीपद उपभोगणाऱ्या नेत्याकडून दुसरी कोणती अपेक्षा करणार? स्वत:च्या नाकर्तेपणाला भावनांची झालर लावणाऱ्या ठाकरेंनी मुलाखतीत व्हिक्टिम कार्ड खेळले. पण, उद्धव ठाकरे यांनी जनतेला मुर्ख बनवण्याचा प्रयत्न करू नये. कारण, जनतेच्या मनातही अनेक प्रश्न सतावत आहेत. सत्तेसाठी तुम्ही बाळासाहेब ठाकरे (Balasaheb Thackeray) आणि हिंदुत्वाशी प्रतारणा केली, तेव्हाच जनतेचा तुमच्यावरील विश्वास संपला.
आताही उद्धव ठाकरे राहुल गांधींचे (Rahul Gandhi) गोडवे गात आहेत. हे तेच राहुल गांधी आहेत, ज्यांनी स्वातंत्र्यवीर सावरकरांवर (Veer Savarkar) शाब्दिक हल्ले केले. स्वातंत्र्यवीर सावरकर आणि हिंदुत्वाचा अपमान करणारे, आता तुम्हाला गोड वाटू लागले. स्वातंत्र्यानंतर यांच्या सत्तापिपासू पिढ्यांनी जनतेची प्रगती आणि विकास शोषून घेतला. तीच मंडळी देशभक्त वाटू लागली, असा हल्लाबोल भाजपाने उद्धव ठाकरेंवर केला.
दरम्यान, मुंबईला काय घातक आहे? मुंबई महापालिका निवडणुका (Mumbai Municipal Elections) कोण
न्यायालयात (Court) गेल्याने रखडल्या आहेत? मुंबईला कोणी किती वर्षे लुटले? मुंबईतून काय बाहेर गेले, काय आले?
क्रिकेटचे सामने मुंबई बाहेर खरंच जाणार का? मुंबईकरांच्या अशा बऱ्याच प्रश्नांची उत्तरे उद्धव ठाकरेंना द्यावी लागणार.
बातोसे सिर्फ वक्त गुजरता है, काम करने के लिए बाहर निकलना जरुरी है,” असा टोलाही लगावला आहे.
Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update
हे देखील वाचा
Pune Gold Rate Today | आजचा पुण्यातील सोने आणि चांदीचा भाव काय? जाणून घ्या
Maharashtra Politics News | शिंदे गटातील आमदाराचे विधान; म्हणाले, – “अजित पवार निश्चित मुख्यमंत्री…”