Maharashtra Politics News | मच्छर मारण्यासाठी धमकीची गरज नाही, राऊतांना आलेल्या धमकीवरुन भाजप नेत्याची टीका

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार (NCP Chief Sharad Pawar) यांना जीवे मारण्याची धमकी (Death Threats) आली आहे. यावरुन राजकीय वर्तुळात खळबळ उडाली असताना उद्धव ठाकरे गटाचे (Uddhav Thackeray Group) खासदार संजय राऊत (MP Sanjay Raut) यांना जीवे मारण्याची धमकी देण्यात आल्याचे समोर आले आहे. राज्यातील दोन बड्या नेत्यांना जीवे मारण्याची धमकी आल्यानंतर (Maharashtra Politics News) आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झडत आहेत. याच दरम्यान भाजप आमदार नितेश राणे (BJP MLA Nitesh Rane) यांनी प्रतिक्रिया देताना आक्षेपार्ह विधान केलं आहे.

 

माध्यमांशी बोलताना नितेश राणे म्हणाले, आदरणीय पवार साहेबांची सगळी काळजी घेण्याची जबाबदारी ही आमच्या सरकारची आहे. तुम्ही ज्या दुसऱ्या व्यक्तीचं नाव घेत आहात… आता मच्छर मारण्यासाठी काही कोणाला धमकी देण्याची गरज नाही. पायाचा बूट हलवला तरी मच्छर मरतो. त्याला धमकीची काय गरज. निलेश राणे यांच्या वक्तव्यामुळे नवा वाद पेटण्याची शक्यता आहे.

 

गुरुवारी (दि.8) 4 ते 4.15 दरम्यान तीन ते चार फोन आले. त्याने मला आणि संजय राऊतांना जीवे मारण्याची धमकी दिली. (Maharashtra Politics News) महिन्यात तुम्हाला गोळ्या घालून स्मशानात पाठवू, सकाळची पत्रकार परिषद बंद करा, अन्यथा दोघांना जीवे मारु, अशी धमकी दिल्याचे सुनील राऊतांनी (Sunil Raut) सांगितलं.

तर शरद पवार यांना सौरभ पिंपळकर (Saurabh Pimpalkar) नावाच्या व्यक्तिच्या ट्विटर हँडलवरुन जीवे मारण्याची धमकी देण्यात आली आहे.
शरद पवार यांना धमकी आल्यानंतर त्यांच्या कन्या आणि खासदार सुप्रिया सुळे यांच्या नेतृत्वाखाली एका शिष्टमंडळाने मुंबईचे पोलीस आयुक्त
(Mumbai CP) विवेक फणसाळकर (IPS Vivek Phansalkar) यांची भेट घेऊन तक्रार केली.
पोलिसांनी घटनेची गांभीर्याने दखल घेऊन तपास करण्याचे आश्वासन दिल्याचे सुप्रिया सुळे (MP Supriya Sule) यांनी सांगितले.

 

 

Web Title :  Maharashtra Politics News | bjp nitesh rane reaction on death threat to sharad pawar and sanjay raut

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा