Maharashtra Politics News | ‘राज्यात धार्मिक दंगली भडकावून आपली राजकीय पोळी भाजण्याचा भाजपाचा कुटील डाव, फडणवीसांनी राजीनामा द्यावा’, काँग्रेस आक्रमक

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – Maharashtra Politics News | कोल्हापूर येथील हिंसाचारानंतर (Violence in Kolhapur) राज्यातील राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. कोल्हापुरच्या परिस्थितीवरुन राजकीय नेत्यांनी सत्ताधाऱ्यांवर हल्ला चढवला आहे. राज्यातील सरकार कायदा व सुव्यवस्था (Law and Order) राखण्यात अपयशी ठरल्याचा आरोप विरोधकांकडून (Maharashtra Politics News) केला जात आहे. दरम्यान, कोल्हापूरातील घटनेवरुन काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष (Congress State President) नाना पटोले (Nana Patole) यांनी शिंदे-फडणवीस सरकारवर (Shinde-Fadnavis Government) गंभीर आरोप करत गृहमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे.

महाराष्ट्रात कटकारस्थान करुन सत्तेत आलेले शिंदे-फडणवीस सरकार कायदा सुव्यवस्था राखण्यात सपशेल अपयशी ठरले आहे. गुन्हेगारांचे मनोबल वाढले असून पोलीस कारवाई करण्यात अपयशी ठरत आहेत. देवेंद्र फडणवीस असतानाच धर्मांध शक्तींना प्रोत्साहन कसे मिळत आहे? राज्यात दंगली घडवण्याचा पहिला प्रयत्न मागील महिन्यात फसला. यानंतर आता पुन्हा औरंगजेबाचा मुद्दा पुढे करुन वातावरण अशांत करण्याचा प्रयत्न केला जात असल्याचा आरोप पटोले यांनी केला आहे. (Maharashtra Politics News)

मुख्यमंत्र्यांनी सक्षम गृहमंत्री नेमावा

मुंबईसारख्या सुरक्षित शहरामध्ये एका विद्यार्थीनीची वसतिगृहात अत्याचार (Mumbai Rape and Murder Case) करुन हत्या केल्याचे समोर आले आहे. राज्यात पोलिसांचे (Mumbai Police) नाही तर समाजकंटकाचे आणि गुन्हेगाराचे राज्य आहे अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. फडणवीस यांचे गृहखात्यावर आणि पोलिसांवर नियंत्रण राहिलेले नाही. त्यामुळे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांनी त्यांचा राजीनामा घेऊन सक्षम गृहमंत्री नेमावा, अशी मागणी नाना पटोले यांनी केली आहे.

राज्यात रोज दंगली सुरु आहेत

नाना पटोले पुढे म्हणाले, या सरकारच्या काळात औरंगजेबाचे उदात्तीकरण सुरु आहे. औरंगजेबाचे उदात्तीकरण करणारे आत्ताच बिळातून बाहेर कसे आले? राज्यात रोज दंगली सुरु आहेत. मुख्यमंत्री व गृहमंत्री काय करत आहेत? शिंदे फडणवीस सरकार नपुंसक आहे असे सुप्रीम कोर्टाने (Supreme Court) म्हटले होते ते खरेच आहे, असे म्हणत नाना पटोले यांनी सरकारवर निशाणा साधला.

गेल्या महिन्यात दंगलीचा प्रयत्न फसला

संभाजीनगर, अहमदनगर, शेगाव, अमरावती, नाशिक याठिकाणी धर्मिक मुद्यांना हवा देऊन राज्यात दंगली (Riot) घडवण्याचा प्रयत्न मागील महिन्यात झाला पण लोकांनी सामंजस्याची भूमिका घेतल्याने तो प्रयत्न फसला. आता पुन्हा धर्मांध शक्ती अहमदनगर व कोल्हापूर जिल्ह्यात औरंगजेबाचा मुद्दा पुढे करुन वातावरण बिघडवण्याचा प्रयत्न करत आहे, असे नाना पटोले म्हणाले.

भाजपाचा कुटील डाव

पोलीस खात्याचा वचक असेल तर गुन्हेगारांची अशी हिम्मत होणार नाही. राज्यात र्धामिक मुद्यांना हवा देऊन दंगली भडकावून आपली राजकीय पोळी भाजण्याचा भाजपाचा (BJP) कुटील डाव आहे. त्यामुळे अशा घटनांकडे फडणवीस दुर्लक्ष करीत आहेत का? राज्यात कायदा सुव्यवस्था राखणे हे गृहविभागाचे काम आहे पण गृहमंत्री आणि पोलीस यंत्रणा काय करते आहे? हा राज्यातील जनतेला प्रश्न पडला आहे, असे पटोले म्हणाले.

सरकार पोलिसांच्या बदल्या मध्ये व्यस्त

काँग्रेसच्या शिष्टमंडळाने 19 मे रोजी या संदर्भात राज्याच्या पोलीस महासंचालकांची (DGP) भेट घेऊन
कायदा सुव्यवस्था राखण्याबाबत आणि महिला सुरक्षेबाबत कठोर पावलं उचलण्याची मागणी केली होती.
मात्र दुर्दैवाने या बाबत काहीच कारवाई होताना दिसली नाही. गुन्हेगारांना जरब बसेल अशी कारवाई होणे गरजेचे आहे.
पण सरकार केवळ पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्यांमध्ये (Police Officer Transfer) व्यस्त आहे हे अत्यंत दुर्दैवी
असल्याचे नाना पटोले यांनी म्हटले.

म्हणून गृहविभागाला न्याय मिळत नाही

राज्याते गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे अर्थ, ऊर्जा, गृहनिर्माण, राजशिष्टाचार अशा सहा विभागांचा कारभार आहे.
तसेच त्यांच्याकडे सहा जिल्ह्यांचे पालकमंत्री पद आहे. त्यामुळे ते गृह विभागाला योग्य न्याय देऊ शकत नाहीत.
फडणवीस यांच्याकडील गृहखाते तात्काळ काढून घ्यावे आणि राज्याला अनुभवी सक्षम व पूर्णवेळ गृहमंत्री द्यावा
अशी मागणी पटोले यांनी केली.

Web Title :  Maharashtra Politics News | congress leader nana patole slams devendra fadnavis over violence in kolhapur and ahmednagar over aurangzeb poster

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Pune Crime News | खून व मोक्का गुन्ह्यातील महिला आरोपीला जामीन मंजूर

Pune Crime News | सिंहगड रोड पोलिसांकडून मोक्कातील फरारी आरोपीला चिपळून येथून अटक

PMFBY-Crop Insurance | पुनर्रचित हवामान आधारित फळपिक विमा योजनेत सहभागी होण्याचे शेतकऱ्यांना आवाहन