Maharashtra Politics News | गरज पडल्यास 48 जागा स्वबळावर लढणार, काँग्रेस नेत्याच्या दाव्याने आघाडीत खळबळ

जळगाव : पोलीसनामा ऑनलाइन – Maharashtra Politics News | गेल्या काही दिवसांपासून महाविकास आघाडीत (Mahavikas Aghadi) जागावाटपावरुन रस्सीखेच सुरु असल्याचे पाहायला मिळत आहे. विरोधी पक्षनेते अजित पवार (Ajit Pawar) यांनी ज्यांची जिथ जास्त ताकद ती जागा तो लढवणार, असं विधाने केलं हतं. अशात आता गरज पडल्यास काँग्रेस महाराष्ट्रातील (Maharashtra Congress) सर्व 48 जागा स्वबळावर लढणार असल्याचा दावा प्रदेश उपाध्यक्ष डॉ. उल्हास पाटील (State Vice President Dr. Ulhas Patil) यांनी केला आहे. (Maharashtra Politics News)

डॉ. उल्साह पाटील म्हणाले, प्रत्येक राजकीय पक्ष हा स्वत:च्या अस्तित्वासाठी संपूर्ण मतदारसंघात तयारी करत असतो. त्यानुसार आम्ही प्रत्येक विधानसभा मतदारसंघात (Assembly Constituency) आपली ताकद काय आहे, याचा आढावा घेतोय. जशी वेळ येईल त्यावेळेला तसं पुढे जाण्याची तयारीही आम्ही ठेवली असल्याचे पाटील यांनी सांगितलं. (Maharashtra Politics News)

डॉ. पाटील पुढे म्हणाले, कोणत्याही परिस्थितीत भाजपला (BJP) हरवायचं हेच महाविकास आघाडीचे लक्ष्य आहे. शिवाय रावेर लोकसभेतला मतदार (Raver Lok Sabha Constituency) हा स्वातंत्र्यपूर्व काळापासून काँग्रेस सोबत राहिला आहे. त्यामुळे रावेर लोकसभा मतदारसंघ हा काँग्रेसलाच मिळेल यात शंका नाही, हे राष्ट्रवादीला (NCP) देखील माहिती असल्याचे डॉ. पाटील यांनी म्हटले.

 

Advt.

उदयपूर येथे झालेल्या अधिवेशनात (Congress session Udaipur) लोकसभा
आणि विधानसभेच्या 50 टक्के जागांवर तरुण आणि महिला चेहऱ्यांना संधी देण्याचा निर्णय झाला,
अशी माहिती डॉ. पाटील यांनी दिली.
उदयपूरला झालेल्या निर्णयानुसार माझी मुलगी डॉ. केतकी पाटील (Dr. Ketaki Patil) ही देखील सक्षम उमेदवार आहे,
असं सांगेत त्यांनी रावेर मतदारसंघातील संभाव्य उमेदवारीचे संकेत दिले.

 

 

Web Title :  Maharashtra Politics News | congress will contest loksabha 48 seats all over maharashtra on its own congress leader claim

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा