Maharashtra Politics News | विनोद तावडेंकडून एकनाथ खडसेंना भाजपमध्ये येण्याची ऑफर, खडसे म्हणाले…

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – Maharashtra Politics News | उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांचे कट्टर प्रतिस्पर्धी असलेल्या एकनाथ खडसे (Eknath Khadse) यांना भाजपचे राष्ट्रीय सरचिटणीस (BJP National General Secretary) विनोद तावडे (Vinod Tawde) यांनी घरवापसीची ऑफर दिली आहे. तावडे यांच्या विधानामुळे महाराष्ट्राच्या राजकारणात (Maharashtra Politics News) तर्कवितर्कांना उधाण आलं आहे. विनोद तावडे मुंबईत एका वृत्तवाहिनीशी बोलत होते. यावेळी तावडे म्हणाले, मला असं वाटतं की, नाथाभाऊंनी परत आले पाहिजे. पक्षात अशाप्रकारच्या लीडरशीपची गरज असल्याचे तावडे यांनी म्हटले.

काय म्हणाले विनोद तावडे?

मला असं वाटतं की, नाथाभाऊंनी परत आलं पाहिजे. पक्षात अशा प्रकारच्या लीडरशीपची गरज आहेच. खडसे यांना ग्रामीण महाराष्ट्राची चांगली जाण असून त्यांच्यासारखा नेता भाजपमध्ये असावा. त्यांच्यासारखा ज्येष्ठ लोकांनी येणे.. पण नुसतं येताना नाथाभाऊ ज्या स्पष्टपणे बोलतात तसं अपेक्षित नसेल. पण जी जी माणसं पक्षात आली पाहिजेत असं आम्हाला वाटतं त्यात नाथाभाऊ आहेत, असं विनोद तावडे म्हणाले. (Maharashtra Politics News)

खडसे यांची भाजपमध्ये येण्याची इच्छा असेल, तर फडणवीस हे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे (Chandrashekhar Bawankule) आणि स्थानिक नेत्यांशी चर्चा करुन उचित निर्णय घेतील. पण खडसे यांना भाजपच्या शिस्तीचे पालन करावेच लागेल, असंही विनोद तावडे यांनी म्हटले. परंतु, माझे एकनाथ खडसे किंवा पक्षश्रेष्ठींशी माझे बोलणे झालेले नाही किंवा त्यांना प्रस्ताव दिलेला नाही, अशी पुस्तीही विनोद तावडे यांनी जोडली.

एकनाथ खडसे म्हणाले?

विनोद तावडे आणि आम्ही अनेक वर्षे भाजपचे काम करत होतो. भाजपमध्ये विनोद तावडेंचे योगदान खूप आहे.
त्यामुळे आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर त्यांना वाटत असावे की जुन्या लोकांनी पक्षात यावे.
कर्नाटकच्या पराभवावरुन त्यांना असे वाटले असावे की जुन्या नेत्यांनी पक्षात परत यावे असं खडसे यांनी म्हटले.

Advt.

ते पुढे म्हणाले, मात्र ज्या पक्षासाठी एवढे केले. 2014 पासून माझा ज्या पक्षात छळ झाला.
अनेक चौकशी लावण्यात आल्या त्या पक्षात आता मी पुन्हा जाणार नाही.
भाजपमध्ये ज्यांच्यावर मोठे मोठे भ्रष्टाचाराचे आरोप आहेत पक्षात येऊन स्वच्छ झाले.
अडचणीच्या काळात शरद पवार (Sharad Pawar) यांनी मला विधानपरिषदेचं सदस्य बनवून राजकीय
विजनवासातून बाहेर काढले. त्यामुळे भाजपमध्ये जाण्याचा प्रश्नच आहे असे एकनाथ खडसे यांनी सांगितले.

Web Title : Maharashtra Politics News | eknath khadse should come back in bjp says vinod tawde

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

MLA Gopichand Padalkar | गोपीचंद पडळकरांची जीभ घसरली, टीका करताना शरद पवारांचा एकेरी उल्लेख (व्हिडिओ)

Pune Crime News | भारती विद्यापीठ पोलिसांकडून कात्रज चौकात रात्रीच्या वेळी परराज्यातील प्रवाशांना लुटणार्‍यांना अटक

Chandrakant Patil – Kothrud Pune | लोकसहभागातून आळंदीत शंभर खोल्याची इमारत उभारण्यात येणार – चंद्रकांत पाटील