Maharashtra Politics News | उद्धव ठाकरे व एकनाथ शिंदे एकत्र येणार, फडणवीसांनी भेट घेतलेल्या नेत्याचे खळबळजनक विधान

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – Maharashtra Politics News | काँग्रेसमधून निलंबित (Congress) करण्यात आलेले माजी आमदार आशिष देशमुख (Former MLA Ashish Deshmukh) यांची गेल्या आठवड्यात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी त्यांच्या निवासस्थानी जाऊन भेट घेतली होती. त्यामुळे राजकीय वर्तुळात आशिष देशमुख भाजपमध्ये (BJP) जाणार अशी चर्चा रंगली होती. दरम्यान, आता आशिष देशमुख यांनी खळबजनक (Maharashtra Politics News) विधान केलं आहे. उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) एकत्र येतील आणि महाविकास आघाडी (Mahavikas Aghadi) तुटेल असं विधान देशमुख यांनी केलं आहे. त्यांच्या या विधानामुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलं आहे.

 

आशिष देशमुख म्हणाले, उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे गट (Shinde Group) एकत्र येऊन महाविकास आघाडी तुटेल. दोन्ही गट एकत्र आल्यानंतर भाजपला पाठिंबा देणार असल्याचा दावाही आशिष देशमुख यांनी केला आहे. (Maharashtra Politics News) सध्याच्या परिस्थितीत ठाकरे गटाचे खासदार (MP), आमदार (MLA) निलंबीत होऊ नयेत म्हणून ठाकरे गट (Thackeray Group) शिंदे गटासोबत जाईल. ठाकरे गटाच्या कोणत्याही आमदार, खासदारांना आपलं राजकीय भवितव्य डावावर लावयचं नाही असं देशमुख म्हणाले.

काही दिवसांपूर्वी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे (Chandrashekhar Bawankule)
यांनी आशिष देशमुख यांची भेट घेतली होती. या भेटीनंतर आशिष देशमुख यांनी केलेल्या या वक्तव्यामुळे सर्वांच्या भुवया उंचावल्या आहेत.
दरम्यान, फडणवीस आणि बवनकुळे यांनी देशमुख यांची भेट घेतल्यामुळे ते सावनेरमधून निवडणूक लढवणार का? अशी चर्चा सुरु झाली आहे.

 

 

 

Web Title :  Maharashtra Politics News | eknath shinde and uddhav thackeray will come together says ashish deshmukh

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा