Maharashtra Politics News | भाजपच्या सर्वेक्षणाचा गोपनीय अहवाल माझ्याकडे, लोकसभेला भाजपला मिळणार केवळ एवढ्या जागा; ठाकरे गटाच्या नेत्याचा गौप्यस्फोट

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – Maharashtra Politics News | आगामी लोकसभा (Lok Sabha) आणि विधानसभा निवडणुकीसाठी (Assembly Elections) राज्यातील राजकीय पक्षांनी मोर्चेबांधणी सुरु केली आहे. भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जेपी नड्डा (BJP National President JP Nadda) काही दिवसांपूर्वी मुंबई दौरा केला होता. त्यावेळी, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्यासोबत लोकसभेच्या जागांवर चर्चा झाली. तर राष्ट्रवादी (MCP) आणि काँग्रेसने (Congress) देखील खासदारांची बैठक बोलावली होती. आता शिवसेना ठाकरे गटाचे (Shiv Sena Thackeray Group) नेते आमदार भास्कर जाधव (MLA Bhaskar Jadhav) यांनीही तयारी (Maharashtra Politics News) सुरु असल्याचे सांगत गौप्यस्फोट केले आहेत. भाजप शिंदे गटाला केवळ लोकसभेपुरतेच सोबत घेणार असल्याचा दावा त्यांनी केला.

 

काही सर्वेक्षणाच्या गोपनीय अहवालाचा (Survey Confidential Report) दाखला देत, राज्यातील आगामी निवडणुकीत भाजपचा दारुण पराभव होणार असल्याचा दावा भास्कर जाधव यांनी माध्यमांशी बोलताना केला. त्यानुसार लोकसभेला केवळ 7 जागांवर भाजप उमेदवार विजयी होतील असा दावा जाधव केला आहे. भाजपने एक ताजं सर्वेक्षण केलेलं आहे. (Maharashtra Politics News) त्या सर्वेक्षणाचा गोपनीय अहवाल माझ्याकडे आलेला आहे. त्यानुसार महाविकास आघाडी (Mahavikas Aghadi) विरुद्ध भाजप-शिंदे गटाला सात जागा जिंकता येतील. त्यातही अतिशय कमी मार्जिनने. तसेच दुसऱ्या एका गोपनीय अहवालानुसार भाजप विधानसभेच्या जागा शिंदे गटाला सोबत न घेता लढणार आहे.

ज्या प्रकारे 2014 मध्ये भाजपने लोकसभा निवडणुकांवेळी उद्धव ठाकरेंना (Uddhav Thackeray) सोबत घेतले.
मात्र, विधानसभा निवडणुकांवेळी धोका दिला. त्याचप्रमाणे लोकसभेला ते शिंदेंना सोबत घेतील
आणि विधानसभेला शिंदे गटाला बाजुला करतील. त्यामुळे शिंदेंची अवस्था ना गर का, ना घाट का अशी होईल, असे भास्कर जाधव यांनी म्हटले.

 

Advt.

भाजपच्या गोपनीय अहवालानुसार विधानसभेला भाजपला राज्यात केवळ 49 जागा जिंकता येतील, असा अहवालत आहे.
तर मुंबई महापालिकेच्या निवडणूक (Brihanmumbai Municipal Corporation Election (BMC)
यंदा केवळ 28 नगरसेवक निवडून येथील, असा दावाही भास्कर जाधव यांनी केला आहे.

 

 

Web Title :  Maharashtra Politics News | i have a confidential report only so many seats for
bjp in the survey bhaskar jadhavs claim for loksabha and vidhansabha

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा