Maharashtra Politics News |  मंत्रीपद मिळाले नाहीतर मातोश्रीची वाट धरणार का?, संजय शिरसाट म्हणाले…

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – Maharashtra Politics News |  एकनाथ शिंदे (Eknath Shinde) आणि त्यांच्या समर्थक आमदारांनी शिवसेनेत बंडखोरी (Rebellion in Shiv Sena) केल्यानंतर राज्यातील महाविकास आघाडीचे सरकार (Mahavikas Aghadi Government) कोसळले. यानंतर एकनाथ शिंदे यांनी भाजपच्या (BJP) पाठिंब्यावर सरकार स्थापन केले. या घटनेला एक वर्ष होत आले तरी अद्याप मंत्रीमंडळाचा विस्तार झालेला नाही. त्यामुळे राज्यातील (Maharashtra Politics News) विकास कामे रखडल्याचा आरोप सत्ताधारी आमदारांकडून केला जात आहे. मंत्रीमंडळ विस्तार (Maharashtra Cabinet Expansion) कधी होणार याकडे सर्वांचे लक्ष लागले असून विस्तार लवकरच होणार असल्याचे बोलले जात आहे.

शिवसेनेत बंडखोरी झाल्यानंतर ठाकरे गटाने (Thackeray Group) सुप्रीम कोर्टात (Supreme Court) धाव घेतली होती. हे प्रकरण जवळपास दहा महिने न्यायालयात होते. त्यामुळे शिंदे गट आणि भाजपने मंत्रिमंडळाचा विस्तार केला नाही, असं सांगितले जात होते. मात्र आता (Maharashtra Politics News) न्यायालयाने निर्णय दिल्यामुळे मंत्रिमंडळ विस्ताराचा मार्ग मोकळा झाला आहे.  मंत्रीमंडळ विस्तारात संजय शिरसाट (Sanjay Shirsat) यांना स्थान मिळणार असल्याची चर्चा सध्या सुरु आहे.

दरम्यान, एका वृत्तवाहिनीशी बोलताना संजय शिरसाट यांना ज्यांना मंत्रीपद मिळणार नाही ते मातोश्रीकडे
परत जाणार असल्याची चर्चा आहे. यावर बोलताना संजय शिरसाट म्हणाले, मातोश्रीवर काय आहे? तिथे उतलंय काय?
उलट तिकडे जे 15 आमदार आहेत ते शिंदे साहेब त्यांना बोलवण्याची वाट बघत आहे. शिंदे साहेबांनी त्यांना बोलवलं
तर ते कधीही वर्षा बंगल्यावर दिसतील. मात्र शिंदे साहेब म्हणतात आधी आमचं आम्हाला बघुद्या, त्यांना कशाला उगाच बोकांडी बसवून घ्ययाचं.

Web Title :   Maharashtra Politics News If you don’t get minister post, will you wait for Matoshree?, Sanjay Shirsat said…

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Maharashtra Police Transfers- PC To PSI Promotion | राज्यातील 385 पोलीस अंमलदारांना पोलीस उपनिरीक्षक पदी पदोन्नती ! पुणे शहरातील 31, पिंपरीमधील 12, पुणे ग्रामीणमधील 3 तर पुणे लोहमार्गमधील 6 जणांचा समावेश; जाणून घ्या नावे

Pune Crime News | Plunge – All Day Kitchen and Bar Pub चा Owner Jitesh Mehta पदेशात? 3 सट्टेबाजांच्या पोलिस कोठडीत 4 दिवसांची वाढ; पैशांच्या देवाण-घेवाणीसाठी G-Pay, UPI चा प्रचंड वापर, अनेक व्यापारी ‘रडार’वर

News Police Stations In Pune | सिंहगड रोड, भारती विद्यापीठ, हडपसर, लोणी काळभोर, लोणीकंद, चंदनगर आणि चतुःश्रृंगी पोलिस स्टेशनचे लवकरच विभाजन !