Maharashtra Politics News | ‘उठ म्हटलं की उठायचं अन् बस म्हणलं की बसायचं, ही शिंदे गटाची…’, ठाकरे गटाच्या नेत्याचे टीकास्त्र (व्हिडिओ)

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – Maharashtra Politics News | शिवसेनेचे नेते एकनाथ शिंदे (Shiv Sena Leader Eknath Shinde) यांनी पक्षात बंडखोरी केली. यानंतर उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी मुख्यमंत्री पदाचा राजीनामा दिल्याने राज्यातील मविआ सरकार कोसळले. शिवसेनेत दोन गट पडले असून ठाकरे विरुद्ध शिंदे असा सामना रंगला आहे. (Maharashtra Politics News) ठाकरे गटाकडून खासदार संजय राऊत (MP Sanjay Raut) आणि आमदार अनिल परब (MLA Anil Parab) हे आपल्या पक्षाची बाजू मांडताना शिंदे गटावर (Shinde Group) जोरदार प्रहार करत आहेत. आता ‘आवाज कुणाचा, पॉडकास्ट शिवसेनेचा’ या कार्यक्रमाच्या माध्यमातून अनिल परब यांनी शिंदे गटावर जोरदार हल्लाबोल केला आहे.
नुकतेच शिवसेनेच्या अधिकृत फेसबुक अकाउंटवर एक पॉडकास्ट व्हिडिओ शेअर करण्यात आला आहे. त्या व्हिडिओतून अनिल परब यांनी शिवसेना शिंदे गट आणि भाजपवर (BJP) निशाणा साधला आहे. बाळासाहेबांचा (Balasaheb Thackeray) विचार आणि वारसा घेऊन जाणार म्हणत काही लोक गुवाहटीला गेले. पण, गुवाहटीला गेलेल्या 40 आमदारांपैकी 25 जणांची नावं मी सांगू शकतो, ज्यांचा बाळासाहेबांसोबत कधीच संबंध आला नाही. अशी लोकं बाळासाहेबांचे विचार आम्ही पुढे नेतोय, असं सांगत आमच्यापासून दूर गेले, असे अनिल परब यांनी म्हटलं आहे. (Maharashtra Politics News)
अनिल परब पुढे म्हणतात, शिंदे गटात सगळ्या शेंड्या या भाजपच्या हातात दिल्या आहेत.
ते उठ म्हटलं की उठायचं अन् ते बस म्हटलं की बसायचं, अशी अवस्था शिंदे गटाची आहे,
असे म्हणत अनिल परब यांनी शिंदे गटाची अवस्था केली असल्याचे परब म्हणाले.
तसेच सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाचा दाखला देत,
शिंदे गटाच्या 16 आमदारांना आणि उर्वरित 23 आमदारांना अपात्र करण्यापासून कोणीही वाचवू शकत नाही, असंही परब म्हणाले.
Web Title : Maharashtra Politics News | ‘If you say get up or sit down, it’s the Shinde group…’,
Thackeray group leader’s criticism
Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update
हे देखील वाचा
- Sanskruti Balgude | मला वाटलं माझ्यावर ॲसिड अटॅक वगैरे होतो की काय…? अभिनेत्री संस्कृती बालगुडेनी सांगितला ‘तो’ किस्सा
- Pune ACB Trap Case | वाघोली येथील तलाठी कार्यालयात मदतनीस म्हणून काम करणार्या दोघांना अॅन्टी करप्शनकडून अटक, 50 हजाराच्या लाचेची मागणी
- Pune RTO Office | शालेय विद्यार्थी वाहतुक करणाऱ्या वाहन मालकांनी वाहनांची तपासणी करुन घेण्याचे आवाहन