Maharashtra Politics News | राष्ट्रवादीचे कार्यकर्ते परवानगी घेऊन शिंदे गटात, राष्ट्रवादीच्या बड्या नेत्याचा खळबळजनक दावा

सोलापूर : पोलीसनामा ऑनलाइन – Maharashtra Politics News | आगामी काळात होणाऱ्या महापालिका, लोकसभा, विधानसभा निवडणुकीसाठी राज्यातील सर्वच पक्षांनी तयारी सुरु केली आहे. एककीडे राजकीय पक्षांकडून पक्ष संघटना मजबूत करण्यावर भर दिला जात असताना सोलापूरमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस (Solapur NCP) पक्षाला मोठा धक्का बसला आहे. (Maharashtra Politics News) अनेक पदाधिकारी, कार्यकर्त्यांनी शिंदे गटात (Shinde Group) प्रवेश केला आहे. मात्र, याबाबत राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील (Jayant Patil) यांनी ते परवानगी घेऊन शिंदे गटात गेल्याचा खळबळजनक दावा केला आहे.

 

जयंत पाटील गुरुवारी सोलापूर दौऱ्यावर आहेत. यावेळी त्यांनी माध्यमांशी बोलताना विविध मुद्यांवर भाष्य केलं. यावेळी त्यांना सोलापूरमधील कार्यकर्त्यांनी शिंदे गटात केलेल्या प्रवेशाबाबत विचारण्यात आले. त्यावर बोलताना पाटील म्हणाले, शिंदे गटात गेलेले आहेत ते तात्पुरते गेले आहेत. शिंदेची सत्ता आहे, शिंदे मुख्यमंत्री (CM Eknath Shinde) आहेत तोपर्यंत सोयी सवलती मिळत असल्याने लोक तिथे गेले आहेत. एका कार्यकर्त्याने सांगितले की सहा महिने जातो, निधी आणतो आणि परत येतो. महत्त्वाच्या कार्यकर्त्याने अशी परवानगी मागितली. नगरपालिकेत निधी येणं गरजेचं आहे. मी जाऊन या सांगितलं. जयंत पाटलांच्या दाव्यामुळे राजकीय वर्तुळात चांगलीच चर्चा रंगली आहे. (Maharashtra Politics News)

 

अमोल कोल्हेचा पत्ता कट?

यावेळी बोलताना जयंत पाटील यांनी अमोल कोल्हे यांच्या उमेदवारीबाबत विधान केले. शिरुर लोकसभा मतदारसंघात (Shirur Lok Sabha Constituency) अमोल कोल्हे (MP Amol Kolhe) हे चांगले उमेदवार आहेत, त्यांनी लोकसभेत उत्तम कामगिरी केली आहे. त्यांनी बैलगाडा (Bullock Cart Race) संदर्भात संसदेत केलेली भाषण गाजली आहेत. अमोल कोल्हे यांची संसदीय कार्यपद्धती उत्तम आहे. त्यांना अनेक प्रश्नांवर आवाज उठवल्याचं जयंत पाटील यांनी म्हटलं आहे.

 

निष्ठावंत भाजपच्या नेत्यांना…

Advt.

दरम्यान यावेळी बोलताना जयंत पाटील यांनी पंकजा मुंडे (Pankaja Munde) यांच्या नाराजीवर देखील प्रतिक्रिया दिली.
भाजप पुढील सध्याच्या काळातील हा मोठा प्रश्न आहे. आमचे राष्ट्रवादीतील अनेक सहकारी भाजपमध्ये (BJP) गेले आहेत.
त्यांना कुठे बसवायचे आणि निष्ठावंत भाजपच्या नेत्यांना कुठे बसवायचे हा प्रश्न भाजपला पडला आहे, असा टोला जयंत पाटील यांनी लगावला.

 

 

Web Title :  Maharashtra Politics News | jayant patil big statement on leaders leave ncp and joining shivsena shinde group

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा