Maharashtra Politics News | शिवसेना-भाजपमध्ये वादाची ठिणगी?, ‘शिवसेनेचं स्वतंत्र अस्तित्व, आम्हाला…’, शिवसेना मंत्र्याचा भाजपला इशारा

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – Maharashtra Politics News | लोकसभा निवडणुकीला (Lok Sabha Elections 2024) अवघे एक वर्ष राहिले असून राजकीय पक्षांनी मतदारसंघाचा आढावा घेण्यासाठी बैठकांचे सत्र सुरु केले आहे. महाविकास आघाडीत (Mahavikas Aghadi) सध्या जागावाटप झाले नसले तरी मित्रपक्ष एकमेकांच्या जागांवर दावा सांगत आहेत. (Maharashtra Politics News) तर शिवसेना (Shivsena) आणि भाजपमध्ये (BJP) जागावाटपावरुन वादाची ठीणगी पडली आहे. शिवसेनेचं स्वतंत्र अस्तित्व आहे, आम्हाला सहज घेऊ नका, असा इशारा राज्याचे आरोग्यमंत्री तानाजी सावंत (Tanaji Sawant) यांनी भाजपला दिला आहे.

तानाजी सावंत म्हणाले, शिवसेनेचं स्वतंत्र अस्तित्व आहे, आम्हाला सहज घेऊ नका. यापूर्वी लोकसभेला लढलेल्या 23 च्या 23 जागा शिवसेना लढवणार असल्याचा दावा सावंत यांनी केला आहे. लोकसभेच्या जागेवरुन भाजपकडून केल्या गेलेल्या वेगवेगळ्या वक्तव्यांवर तानाजी सावंत यांनी त्यांच्या शैलीत प्रत्युत्तर देताना भाजपला इशारा दिला आहे.

काही दिवसांपूर्वी भाजपचे आमदार राणा जगजितसिंह पाटील (BJP MLA Rana Jagjit Singh Patil) यांनी धाराशीवची जागा भाजप लढवणार असल्याचा दावा केला होता. त्यावर तानाजी सावंत यांनी ही जागा शिवसेना लढवणार असल्याचं ठणकावून सांगितलं. सावंत यांच्या या दाव्यामुळे धाराशीव लोकसभा जागेवरुन शिवसेना-भाजपमध्ये वादाची ठिणगी पडण्याची शक्यता आहे.

पडळकरांना टोला

तानाजी सावंत यांनी भाजप आमदार गोपीचंद पडळकर (MLA Gopichand Padalkar) यांना टोला लगावला आहे.
वय आणि अनुभव पाहून राजकीय टीका करावी, असा सल्ला त्यांनी पडळकरांना दिली.
गोपीचंद पडळकर यांनी शरद पवार (Sharad Pawar) यांचा ऐकेरी उल्लेख करुन टीका केली,
ही टीका सावंत यांना आवडली नाही. राजकीय टीका करताना समोरच्याचं वय आणि राजकीय अनुभव पाहून बोलावं, असं तानाजी सावंत म्हणाले.

शिवसेना-भाजप एकत्र लढणार – मुख्यमंत्री

राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
(Devendra Fadnavis) यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह (Amit Shah) यांची भेट घेतली.
रविवारी रात्री त्यांच्यामध्ये बैठक पार पडली. या बैठकीत आगामी सर्व निवडणुकीत भाजप-शिवसेना
(BJP-Shiv Sena Alliance) एकत्र लढवणार असल्याचा निर्णय घेण्यात आल्याची माहिती एकनाथ शिंदे यांनी दिली आहे.

Web Title : Maharashtra Politics News | loksabha elections 2024 shivsena leader tanaji sawant warns bjp over dharashiv seat

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Maharashtra Politics News | विनोद तावडेंकडून एकनाथ खडसेंना भाजपमध्ये येण्याची ऑफर, खडसे म्हणाले…

Shirur Lok Sabha | शिरूर लोकसभेचा राष्ट्रवादीमधील वाद मिटला?, विलास लांडे म्हणाले-‘अमोल कोल्हे यांना…’

72 Hoorain Teaser Release | लव जिहादचे रहस्य उलघडून सांगणारा आणखी एक चित्रपट ‘72 हुरैन’ लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला