Maharashtra Politics News | आगामी निवडणुका एकत्र लढण्यावर तिन्ही पक्षांचे एकमत, मविआच्या बैठकीनंतर जयंत पाटलांची माहिती

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – Maharashtra Politics News | राज्यात महाविकास आघाडी म्हणून आगामी लोकसभा (Lok Sabha), विधानसभा निवडणुका (Assembly Election) लढण्यावर काँग्रेस (Congress), राष्ट्रवादी आणि शिवसेना ठाकरे गटाचे (Sena Thackeray Group) एकमत झाले आहे. राष्ट्रवादीचे प्रमुख शरद पवार (NCP Chief Sharad Pawar) यांच्या बंगल्यावर महाविकास आघाडीतील पक्षाच्या प्रमुख नेत्यांची बैठक (Mahavikas Aghadi Meeting) रविवारी पार पडली. या बैठकीत (Maharashtra Politics News) आगामी काळातील वाटचालीबाबत चर्चा झाली असल्याची माहिती राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील (Jayant Patil) यांनी दिली.

कर्नाटक विधानसभा निवडणुकीतील निकालाच्या पार्श्वभूमीवर आज राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांच्या प्रमुख उपस्थितीत (Maharashtra Politics News) मुंबई येथील त्यांच्या निवासस्थानी महाविकास आघाडीतील सर्व मित्रपक्षांची आढावा बैठक पार पडली. या बैठकीला माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Former CM Uddhav Thackeray) , विधानसभा विरोधी पक्षनेते अजित पवार, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील (Ajit Pawar), काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले (Congress State President Nana Patole), माजी मंत्री बाळासाहेब थोरात (Balasaheb Thorat), माजी मंत्री अशोक चव्हाण (Ashok Chavan), खासदार संजय राऊत (MP Sanjay Raut), खासदार सुप्रिया सुळे (MP Supriya Sule), माजी मंत्री जितेंद्र आव्हाड (Jitendra Awhad), आमदार भाई जगताप (MLA Bhai Jagtap), माजी आमदार नसीम खान (Former MLA Naseem Khan) उपस्थित होते. बैठकीनंतर तिन्ही पक्षांनी संयुक्तपणे पत्रकार परिषद घेतली.

जयंत पाटील म्हणाले, भाजपचा कर्नाटकात मोठा पराभव झाला आहे. या निवडणूक निकालाचे विश्लेषण करण्यात आले. सुप्रीम कोर्टाच्या निकालाबाबत चर्चा करण्यात आली. या निकालानंतर त्यापुढील वाटचाल याबाबत चर्चा करण्यात आली असल्याचे जयंत पाटील यांनी सांगितले. उन्हाळा कमी झाल्यानंतर पाऊसमान पाहून सभा सुरु करणार असल्याचे पाटील यांनी सांगितले. उन्हाची तीव्रता कमी झाल्यावर मविआची वज्रमूठ सभा (MVA Vajramuth Sabha) पुन्हा सुरु होणार असल्याचे त्यांनी सांगितले.

आगामी निवडणुका एकत्रित लढणार

महाविकास आघाडीतील तिन्ही पक्ष आगामी विधानसभा, लोकसभा निवडणूक एकत्रितपणे लढवणार असल्याची माहिती जयंत पाटील यांनी दिली. या निवडणुकीतील जागा वाटपाबाबत महाविकास आघाडी आणि इतर घटक पक्षांचे नेते चर्चा करणार असल्याचे त्यांनी दिले. तसेच कर्नाटक प्रमाणे महाराष्ट्रात यश मिळेल असा विश्वास जयंत पाटील यांनी व्यक्त केला.

 

कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांचा सत्कार पुण्यात

काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले म्हणाले, कर्नाटकच्या जनतेमध्ये भाजप विरोधात रोष होता तो मतपेटीतून व्यक्त झाला आहे.
कर्नाटकमधील जनतेने मोदी-शाह यांच्यावरचा राग काढला आहे.
महाविकास आघाडीची वज्रमूठ सभा पुन्हा एकदा सुरु होणार आहे.
पुढील सभा पुण्यात होणार असून या सभेत कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांचा सत्कार केला जाणार असल्याचे पटोले यांनी सांगितले.

 

Web Title :- Maharashtra Politics News | maha-vikas-aghadi-will-contest-assembly-and-lok-sabha-
election-together-seat-sharing-discussion-will-soon-maharashtra-politics news

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Pune Crime News | पुणे क्राईम न्यूज : लोणीकंद पोलिस स्टेशन – 3 हजार रूपयांसाठी संगणक
अभियंत्याचा खून करणार्‍या कॅब चालकाला अटक; जाणून घ्या मर्डरची स्टोरी