Maharashtra Politics News |  ठाकरे गटाला पाहिजेत लोकसभेच्या इतक्या जागा, मविआच्या बैठकीतील महत्त्वाची बातमी लिक!

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – Maharashtra Politics News |  कर्नाटक विधानसभा निवडणुकीत (Karnataka Assembly Elections) भाजपाचा (BJP) दारुण पराभव करत काँग्रेसनं (Congress) ऐतिहासिक विजय मिळवला आहे. या निकालामुळे विरोधी पक्षांमध्ये उत्साहाचे वातावरण आहे. कर्नाटक निकालानंतर दुसऱ्याच दिवशी महाराष्ट्रातील महाविकास आघाडीची (Maharashtra Politics News) महत्त्वाची  बैठक शरद पवार (Sharad Pawar) यांच्या निवासस्थानी  झाली. या बैठकीला मविआचे (Mahavikas Aghadi) महत्त्वाचे नेते उपस्थित होते. या बैठकीत लोकसभा निवडणुकीच्या (Lok Sabha Elections) जागा वाटपावर चर्चा झाली. मात्र, यावरुन मविआत बिघाडी होण्याची शक्यता आहे.

शरद पवार यांच्या निवासस्थानी मविआच्या बैठकीत लोकसभा निवडणुकीसाठी महाराष्ट्रातील 48 जागांच्या वाटपाबाबत (Maharashtra Politics News) चर्चा झाली, अशी माहिती बैठकीला उपस्थित असलेल्या नेत्यांनी दिली. काँग्रेस-राष्ट्रवादीचे (NCP) काही नेत्यांकडून लोकसभा निवडणुकीत तीनही पक्षा समसमान जागांवर निवडणूक लढवतील अशी चर्चा झाल्याची माहिती पसरवली जात आहे.

एका वृत्तवाहीनेने दिलेल्या वृत्तानुसार, 2019 च्या लोकसभा निवडणुकीमध्ये राज्यातून शिवसेनेचे 18 खासदार (Shivsena MP) निवडून आले होते. त्यामुळे 2024 च्या लोकसभा निवडणुकीत शिवसेना 20 जागांवर लढण्यावर ठाम असल्याचे सांगण्यात आल्याची माहिती वरिष्ठ सूत्रांनी वृत्तवाहिनीला दिली आहे. बैठकीमध्ये स्वत: उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी समसमान जागांच्या चर्चेला विरोध केला होता. त्यामुळे सध्या मविआ मध्ये लोकसभेच्या समसमान जागांच्या चर्चेवरून वाद उद्भवण्याची शक्यता आहे.

 

Web Title : Maharashtra Politics News mahavikas-aghadi-meeting-uddhav-thackeray-not-agree-with-same-seats-to-all-for-loksabha-elections

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा